Video: ‘मुळशी पॅटर्न’चा थरारानंतर पोलिसांनी काढली गुंडांची धिंड…

नाशिक : ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाच्या कथानकानुसार जीवे मारण्याची धमकी देऊन जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून 13 आरोपी फरार आहेत. या गुंडाची दहशत कमी करण्यासाठी त्याच परिसरातून अटक करण्यात आलेल्या आरोपींची धिंड काढण्यात आली आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत बनावट दस्तऐवज तयार करून जबरदस्तीने जमिनी बळकवण्याची घटना येवला येथे घडली होती. पोलिसांनी तातडीने हालचाली करून टोळीतील 17 पैकी 4 आरोपीच्या मुसक्या आवळ्या असून मुख्य आरोपीसह 13 आरोपी फरार आहेत. फरार आरोपींमध्ये जमीन खरेदी विक्रीचे दस्त तयार करणारे दलाल, त्याची नोंद करणारे अधिकारी यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींची शहरात दहशत होती. त्यामुळे नागरिक घाबरत होते. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी पकडलेल्या आरोपीची थेट धिंडचं काढली. फरार आरोपी बाबत धागेदोरे लागले असून लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, नाशिक शहरात गेल्या काही दिवसात जणू हत्यासत्रच सुरू होते. आठवड्यात तीन हत्या झाल्या त्याही भरदिवसा. या घटनानंतर शहरात कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात यंदा गुन्हेगारी कमी झाल्याचे आकडेवारी सांगत आहे.

नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच; तीन दिवसात दोन खून…

नाशिकमध्ये टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू…

Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…

भाजी विक्रेत्या युवकावर हल्लेखोरांनी दिवसा सपासप केले वार…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!