पोलिसकाकाची घराजवळच गोळ्या झाडून निर्घृण हत्या…
चंदीगड (हरियाणा) : कर्नाला चालण्यासाठी बाहेर पडलेल्या क्राइम ब्रांचच्या ASI अधिकाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यमुनानगर परिसरात घरापासून काही अंतरावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आहेत. डोक्याला आणि पाठीवर गोळी लागली आहे. या गोळीबारात एएसआय संजीव यांचा मृत्यू झाला आहे. संजीव हे हरियाणाचा पोलिस क्राइम ब्रँच विभागात कार्यकरत होते.
‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
संजीव यांचं काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन झाले होते. ते कामावरुन घरी आल्यानंतर काही वेळाने चालायला पुन्हा बाहेर पडले. यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर गाळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. एक गोळी डोक्यात तर दुसरी कंबरेला लागली. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिस आणि सीआयएचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरुन गोळ्यांचे शेल जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कुटुंबावर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी संजीव यांचा भाऊ आणि वडिलांचेही निधन झाले होते. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुजेज तपासले आहे. पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू…
पोलिसकाकाने नातेवाईक महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे केली आत्महत्या…
पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले की…
धक्कादायक! पोलिसकाकाला नाकाबंदीदरम्यान ट्रकने चिरडले…
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…