ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…

पुणे : ड्रॅग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलसांनी नेपाळच्या सीमेवरून मंगळवारी (ता. १०) अटक केली आहे. विमानाने त्यांना पुण्यात आणल्यानंतर आज (बुधवार) न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोघांच्या कोठडीवरुन न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलंच खडसावले आहे. ललित पाटील एवढे दिवस तुमच्या ताब्यात असताना त्याला नीट सांभाळता आले नाही आणि आता भूषण आणि अभिषेककडे काय तपास करणार, असे म्हणत पोलिस कोठडीची मागणी करणाऱ्या पोलिसांना न्यायाधीशांनी संतप्त होऊन पोलिसांना सुनावले. ललित पाटील पळून गेल्याने पोलिस खात्यावर आणि त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे पोलिस कोठडी मागू नका, असेही यावेळी न्यायाधीशांनी म्हटले.

भूषण आणि अभिषेक या दोघांना न्यायालयाने तुमचे वकील कोण? असे विचारले असता आम्ही वकील दिलेले नाहीत, असे त्यांनी न्यायाधीशांना सांगितले. त्यानंतर न्यायाधीशांनी या दोन आरोपींना सरकारी खर्चातून वकील देण्याचे आदेश दिले. न्यायालयात हजर असलेल्या वकिलांना तुमच्यापैकी कोणी या दोन आरोपींचे वकीलपत्र घेण्यास तयार आहे का? असे विचारले. त्यानंतर न्यायालयात उपस्थित एक वकील आरोपींचे वकीलपत्र घ्यायला तयार झाले.

दरम्यान, भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना पोलिसांनी 14 दिवसांची पोलिस कोठडी मागितली. मात्र, 5 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. कोणत्याही आरोपीला जास्तीत जास्त 14 दिवस पोलिस कोठडी देता येते. त्यामुळे ललित पाटील जेव्हा पकडला जाईल तेव्हा त्याच्यासोबत भूषण आणि अभिषेकची एकत्रित चौकशी करायची असेल तर त्याची 14 दिवसांची पोलिस कोठडी एकाचवेळेस संपवू नका, असेही न्यायाधिशांनी पोलिसांना सांगितले.

ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…

ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…

ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!