कारागृहातील विभागातील अधिक्षकांची पदोन्नती; पाहा नावे…

पुणे (संदीप कद्रे): गृह विभागाच्या अधिनस्त कारागृह विभागातील अधीक्षक, कारागृह मध्यवर्ती कारागृह, गट –अ या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागातंर्गत गृह विभाग, शासन निर्णय ०६.०६.२०१५ अन्वये गठीत नागरी सेवा मंडळाची बैठक दिनांक ०८.०९.२०२३ रोजी पार पडली. नागरी सेवा मंडळाच्या सदर बैठकीतील शिफारशीनुसार अधीक्षक, जिल्हा कारागृह वर्ग-१/ अतिरिक्त अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह या पदावर कार्यरत असलेल्या खालील अधकिाऱ्यांना अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

पदोन्नतीचा आदेश शासनाने दिनांक ०९.१०.२०२३ रोजी जारी केला आहे. पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांचे अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे अमिताभ गुप्ता यांनी हार्दिक अभिनंदन केले. जबाबदारीच्या पदावर कर्तव्य बजावतांना कारागृह विभागाचे नाव उंचावेल अशा प्रकारचे काम करणेबाबत निर्देश दिले. विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह मुख्यालय) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी देखील पदोन्नत अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून कारागृह विभागात प्रभावीपणे काम करण्यास शुभेच्छा दिल्या.

१०.१०.२०२३ रोजी कारागृह मुख्यालयात मासिक आढावा बैठकीच्या निमीत्ताने सर्व पदोन्नत अधिकारी उपस्थित होते. अमिताभ गुप्ता, अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह मुख्यालय), स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे, योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई, यु.टी.पवार, कारागृह उपमहानिरीक्षक, मध्य विभाग, औरंगाबाद यांच्या उपस्थितीमध्ये पदोन्नत अधिकारी यांचे अभिनंदन करून विभागाच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

०६.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार गृह विभागाच्या अधिनस्त कारागृह व सुधार सेवा विभागात सद्य:स्थितीत मंजूर असलेल्या ५०६८ पदांव्यतिरिक्त विविध संवर्गात २००० पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यामुळे कारागृह अधिकारी/कर्मचारी यांच्यावरील कामाचा ताण कमी होणार आहे.

अधिकाऱ्यांचे नाव – पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
हर्षद भिकनराव अहिरराव – मुंबई मध्यवर्ती कारागृह
राणी राजाराम भोसले – ठाणे मध्यवर्ती कारागृह
वैभव सुधाकर आगे – नागपूर मध्यवर्ती कारागृह
किर्ती राजेश चिंतामणी – अमरावती मध्यवर्ती कारागृह
अरुणा अर्जुनराव मुगुटराव – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह
नितीन भालचंद्र वायचळ – दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी, प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे
सुनिल निवृत्ती ढमाळ – येरवडा मध्यवर्ती कारागृह
प्रमोद भिलाजी वाघ – तळोजा मध्यवर्ती कारागृह

ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता…

अमिताभ गुप्ताः आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!

अमिताभ गुप्ता यांची संकल्पना! येरवड्यातील कैदी उपहागृहात बनवणार विविध पदार्थ…

महाराष्ट्रातील कैद्यांना झाली पगारवाढ; पगार किती मिळतो पाहा…

स्वातंत्र्यदिनी राज्यातील 186 कैद्यांची कारागृहातून होणार सुटका; पाहा यादी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!