
पोलिसकन्या संस्कृतीच्या हत्येचं गूढ 10 दिवसानंतरही कायम…
अमरावती : अमरावतीच्या गाडगे नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जिजाऊ नगर कॉलनीमध्ये राहणाऱ्या संस्कृती संजय राऊत (वय 26) या युवतीचा मृतदेह 28 जानेवारीच्या संध्याकाळी तिच्याच घरात सापडला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. पण, अद्याप आरोपी सापडलेला नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी राऊत कुटुंबासह संस्कृतीच्या संपर्कात असलेल्या एका युवकाची सुद्धा पोलिस स्टेशनमध्ये चौकशी केली. पण, पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागले नाही, त्यामुळे संस्कृतीच्या हत्येचं गूढ 10 दिवसानंतरही कायम आहे.
संस्कृती हिचे वडील संजय राऊत हे पोलिस कर्मचारी आहेत. 28 जानेवारीला संजय राऊत यांची मोठी मुलगी संस्कृती घरात एकटी होती. संस्कृतीची आई आणि छोटी बहीण परिसरामध्ये असलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. दोघीही जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांना संस्कृतीच्या खोलीमध्ये तिचा मृतदेह जमिनीवर पडलेल्या अवस्थेत मिळाला. ओढणीच्या सहाय्याने संस्कृतीचा गळा घोटण्यात आला होता, तसेच तिच्या नाकातून आणि तोंडातून रक्तही बाहेर आले होते.
राऊत कुटुंबाला संस्कृतीचा मृतदेह पाहताच धक्का बसला, यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं. सुरूवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, पण घटनेच्या तीन दिवसानंतर डॉक्टरांनी संस्कृतीचा प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना दिला. यात श्वास कोंडल्यामुळे संस्कृतीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच मृत्यूआधी संस्कृतीची कुणासोबत तरी झटापट झाल्याचा संशय व्यक्त केला गेला. यानंतर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्वत: घटनास्थळी भेट देऊन संस्कृतीच्या कुटुंबासोबत चर्चा केली. यानंतर गाडगेनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 10 दिवसानंतरही संस्कृतीचा मारेकरू सापडलेला नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक Video! बहिणीच्या लग्नात नाचताना युवतीचा मृत्यू…
विवाहित महिलेचा खून केल्यावर प्रियकराने केला मृतदेहावर बलात्कार…
प्रेम प्रकरण! पुणे शहरातील पोलिसकाकाच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल…
इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुलीसोबत ओळख करुन केला अत्याचार…
धक्कादायक Video: पुणे शहरात वृद्ध महिलेला लुटण्यासाठी युवतीने काय-काय केले पाहाच…

