
पुणे शहरात दरोडा टाकणाऱ्या महिला दरोडेखोर टोळीस शिताफीने केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड परीसरात दरोडा टाकणा-या महिला दरोडेखोर टोळीस मार्केटयार्ड पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मार्केटयार्ड पोलिस स्टेशन कडील गु.र.नं. २११ / २०२५ भा. न्या. स. कलम-३०५(अ),३३१(३), ३१०(२) अन्वये गुन्हा दाखल असुन तपास पथकाचे प्रभारी पोलिस उप-निरीक्षक अक्षयकुमार गडगडे यांना दाखल गुन्हातील महिला आरोपी बाबत माहिती मिळाल्याने व तांत्रीक विश्लेषनाचे आधारे आणि गुप्त माहितीद्वारा मार्फत मिळालेल्या मोहीती द्वारे खात्री झाली कि, सदर आरोपी महिला या मोहिदेपुर, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी आहेत. मार्केटयार्ड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिषा पाटील यांना याबाबात सांगण्यात आल्यानंतर त्यांनी सदर महिला आरोपी यांचा शोध घेणे करीता तात्काळ तपास पथकाचे प्रभारी पोलिस उप-निरीक्षक अक्षयकुमार गडगडे यांना आदेशित केले.
तपास पथकाचे प्रभारी अक्षयकुमार गडगडे यांनी २१/११/२०२५ रोजी सदर कामगिरीसाठी तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक सुनिल भापकर, पोहवा / ३४५३ राजेश थोरात, पोहवा / ९६३ महेश जेधे, मपोहवा / ७१५२ वनिता माने, मपोहवा / ६१९४ धनश्री गोफणे, मपो / १४४२ सरतापे, पोहवा / सचीन पवार यांना मोहिदेपुर, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा येथे जाणेसाठी नियुक्त केले. आदेशाप्रमाणे तपास पथक हे सदर कामगिरीसाठी रवाना झाले. पथक जळगाव जामोद येथे पोहचताच तेथील स्थानिक पोलिस व सदर गावचे पोलिस पाटील गोंविदा शिंदे यांचे मदतीने सदर गांवात महिला आरोपींचा शोध घेण्यात आला. परंतु सदर महिला या सराईत असल्याने त्यांना गांवात पोलिस आले आहेत याची माहीती मिळाल्याने त्या महिला शेतात व जंगलात लपुन बसल्या होत्या. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यास अडचण निर्माण होत होती. परंतु तेथील पोलिस पाटील यांचे मदतीने सदर महिलांचा शोध घेण्यात आला व त्या ज्या ठिकाणी
लपून बसल्या होत्या त्याठिकाणावरुन त्यांना ताब्यात घेण्यात आले.
सराईत दरोडेखोर महिलांची नावे पुढीलप्रमाणे…
१) सुनिता पिंटु सोळंकी, वय २२ वर्षे, रा ठी मोहिदेपुर गाव तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा, २) मीना रवी सोळंकी, वय २३ वर्षे, धंदा मजुरी रा. सदर, ३) बत्ती गणपत शिंदे, वय २५ वर्षे, रा. सदर, ४) पुजा जगदेव सोळंके, वय २० वर्षे, रा. सदर, ५) आईना अंकुश सोळंके, वय २७ वर्षे, रा सदर व एक
विधिसंघर्षीत बालिका यांना चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले आहे. सदर महिला दरोडेखोर यांना पुढील तपासकामी पुणे येथे आणुन अटक करण्यात आली असुन त्यातील एक विधिसंघर्षीत बालिकेस अभिरक्षा कक्षात ठेवण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, रंजनकुमार शर्मा सह पोलिस आयुक्त, मनोज पाटील अप्पर पोलिस आयुक्त, राजकुमार शिंदे पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, नम्रता देसाई सहा पोलिस आयुक्त, वानवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिषा पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनिता नवले यांचे आदेशाने तपास पथकाचे प्रभारी पोलिस उप-निरीक्षक अक्षयकुमार गडगडे, पोलिस उप-निरीक्षक सुनिल भापकर, पोहवा / ३४५३ राजेश थोरात, पोहवा / ९६३ महेश जेधे, मपोहवा / ७१५२ वनिता माने, मपोहवा / ६१९४ धनश्री गोफणे, मपो / १४४२ सरतापे, पोहवा / सचीन पवार, पोहवा / ४०९४ दत्तात्रय राऊत, पोहवा / ६८५ कौस्तुभ जाधव, पोहवा / ७५५४ किरण जाधव, पोअं / २३९२ आशिष यादव यांनी केली आहे.
पुणे हादरलं! महिलेने गुंगीचं औषध देऊन युवकावर केला बलात्कार…
पुणे! बंडगार्डन पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी…
पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन आवळल्या ३६ जणांच्या मुसक्या…
पुणे! टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर लावला मोक्का; दणाणले धाबे…
पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या तिन्ही पोरांची काढली धिंड…

