पिंपरी-चिंचवडच्या पोलिसकाकाने जिंकले दीड कोटी रुपये; पण…

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) सोमनाथ झेंडे यांनी ऑनलाईन गेम असलेल्या ड्रीम इलेव्हन वर तब्बल दीड कोटी रुपये जिंकले आहेत. पण, त्यांनी अशा गेम्सपासून सावध राहिले पाहिजे, असे आवाहनही केले आहे.

सोमनाथ झेंडे हे गेल्या तीन महिन्यांपासून ड्रीम इलेव्हनवर टीम बनवत आहेत. बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यासाठी झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर टीम लावली होती. सामना संपल्यानंतर सोमनाथ झेंडे यांनी त्यांचा मोबाईल पाहिला असता यांची टीम पहिल्या क्रमांकावर आली होती. ड्रीम इलेव्हनवर दीड कोटी जिंकल्यानंतर त्यांच्यासह त्यांचे कुटुंबही खूश झाले आहे. पण, ऑनलाईन गेमिंग धोकादायक असल्याचे झेंडे यांनी सांगितले.

जेजुरी गावचे रहिवासी असलेले सोमनाथ झेंडे म्हणाले, ‘ऑनलाइन गेम्सपासून आपल्याला सावध राहिले पाहिजे, कारण याचे व्यसन लागून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. हे पैसे मिळाले असले तरी आपण पोलिस दलात राहणार आणि देशसेवा करणार आहे. मिळालेल्या रकमेपैकी काही रक्कम समाजकार्यासाठी वापरणार आहे, तसेच हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार आहे.’

दरम्यान, ड्रीम इलेव्हनवर ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून पैसे कमावले जातात, जो भारतीय स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म आहे. ड्रीम इलेव्हनवर फॅन्टसी क्रिकेटशिवाय फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल आणि कबड्डी खेळता येऊ शकते.

आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर

कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी

क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!

शब्बीर सय्यद: कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!