DSP कल्पना वर्मा यांचे चॅटिंग व्हायरल झाल्याने खळबळ…

रायपूर (छत्तीसगड): छत्तीसगडच्या DSP कल्पना वर्मा आणि एका व्यावसायिक दीपक टंडन यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दोघांचे फोटो, व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स, व्हिडीओ आणि कागदपत्रे लीक होत आहेत.

छत्तीसगडमधील DSP कल्पना वर्मा आणि उद्योगपची दीपक टंडन यांची लव्हस्टोरी गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. दीपक टंडनने काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स मीडिया समोर आणले आहेत. या चॅटमध्ये कल्पना पैशांची मागणी आणि दीपकला पत्नीला घटस्फोट घेण्यास सांगताना दिसत आहे. तसेच समोर आलेल्या चॅट्समध्ये ती दीपकला मला भेटायला या ना…, पत्नीला घटस्फोट द्या, आपण एकत्र राहू… मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही असे बोलताना दिसत आहे.

कल्पना वर्मा आणि स्थानिक कोट्यधीश उद्योगपती दीपक टंडन यांचे संबंध आता फक्त प्रेमकहाणीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर लव्ह, सेक्स, धोका आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बदलले आहेत. उद्योगपती दीपक टंडन याने डीएसपीवर नात्याचा गैरफायदा घेऊन 2 कोटी रुपये रोख आणि मौल्यवान वस्तू फसवून घेतल्याचा आरोप केला आहे.

२०२१ पासून सुरू झालेले हे नाते आता उघड झाले आहे. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. डीएसपीने मोठ्या प्रमाणात पैसे आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या आहेत, असा आरोप दीपक टंडन यांनी केला आहे. उद्योगपतीचा दावा आहे की, डीएसपी कल्पना वर्मां यांना अनेक हप्त्यांत २ कोटी रुपये रोख दिले. याशिवाय हिऱ्याची अंगठी, सोन्याची साखळी आणि एक महागडी गाडीही डीएसपीने घेतली. शिवाय, एका हॉटेलची रजिस्ट्री आपल्या भावाच्या नावावर करून घेतली आहे.

प्रेमसंबंध! पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी महिला शिपायाला अटक…

पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..

नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट; पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती समोर…

प्रेमसंबंधाच्या चर्चेला उधाण! पोलिस अधिकाऱ्यासोबत बायकोला रंगहात पकडले अन्…

पोलिस अधिकाऱ्यासोबत महिला डॉक्टरचे प्रेमसंबंध अन् आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!