भारती विद्यापीठ पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्यास केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर गावठी कट्टा व दोन राऊंड बाळगणा-या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार २४/११/२०२३ रोजी हे दैनंदिन कर्तव्य करीत असताना पोलिस अंमलदार महेश बारवकर, निलेश ढमढेरे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आंबेगाव बु.. जांभुळवाडी तलाव येथे एक जण गावठी कट्टा घेवून थांबला आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी जांभुळवाडी तलाव येथे जावून बातमीप्रमाणे व्यक्तीचा शोध घेतला असता तेथे मामा पान शॉप पुढील पुलावर बातमीप्रमाणे योगेश हनुमंत मालुसरे (वय ४१ वर्षे, रा.सध्या फ्लॅट नंबर ४०१, ओम हाईटस, सिध्दीविनायक सोसायटी, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे) हा त्याचे ताब्यात एक ४०,०००/- रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व ४००/- रुपये किंमतीचे २ जिवंत काडतूस असा एकुण ४०,४००/- रुपयांचे मुद्देमालासह मिळून आला. आरोपी विरुध्द भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७६५/२०२३, भारतीय हत्याराचा अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ हे करीत आहे.
सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलिस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारती विदयापीठ पोलिस स्टेशन विनायक गायकवाड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार शैलेश ढमढेरे, महेश बारवकर, सचिन सरपाले, मितेश चोरमोले, शैलेश साठे, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश जमदाडे, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी सराईत वाहन चोरास शिताफीने केली अटक…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…
पुणे शहरात कुत्र्याचा मृत्यू, दोन डॉक्टरासह चार जणांवर गुन्हा दाखल…
पुणे शहरात युवकाला नग्न करुन लावलं नाचायला अन् पुढे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!