पुणे! बाणेर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत चोरट्यांना केली अटक; मुद्देमाल जप्त…

पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील बाणेर परिसरात क्रेनमधील बॅटरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना बाणेर पोलिसांनी अवघ्या पाच तासात अटक केली असून, मुद्देमाल जप्त केला आहे. बाणेर पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

२१/०४/२०२६ रोजी पहाटे ०४/०० वा. ते दि. २८/०४/२०२६ रोजी सकाळी ०९/३० वा चे दरम्यान फिर्यादी यांच्या दोन क्रेन ह्या विजय सेल्स बाणेर रोड पेट्रोल पंपाचे जवळ पुणे येथे सुरक्षित लॉक करुन पार्क करून ठेवल्या होत्या. त्यांचा क्रेन नं. ०३०००६५७६३ व ०३०००६५६९९ ह्या मधील टॉरझन कंपनीच्या काळ्या रंगाच्या ४८ व्होल्ट क्षमतेच्या एकुण १६ बॅटऱ्या प्रत्येक बॅटरीची कि. अं. ३५,०००/- रु असा एकुण ५,६०,००० (पाच लाख साठ हजार रुपयाचा माल ) कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार दाखल होती.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

बाणेर पोलिस स्टेशनकडील तपास पथक अधिकारी अंमलदार यांनी अत्यंत कसोशिने घटनास्थळावर मिळून आलेले सीसीटीव्ही आणि त्याच्या व्यतिरीक्त तपासाचे अनुषंगाने विविध १२५ सीसीटीव्ही फुटेज चेक करीत असताना पोहवा बाबा आहेर, पोहवा किसन शिंगे व पोशि अतुल इंगळे यांना सीसीटीव्ही फुटेजमधील संशयीत व्यक्ती हा इंदिरा वसाहत औंध पुणे येथील असल्याचे निष्पन्न झाले. बातमीदारांमार्फत निष्पन्न गुन्हा करणारे आरोपीचा सध्याचा ठावठिकाणा घेवून दाखल गुन्ह्यातील आरोपी
१) सुनिल नवनाथ लोखंडे वय ३० वर्षे धंदा – बिगारी रा. आंबेडकर चौक, इंदिरा वसाहत औंध पुणे
२) साहिल अशोक माने वय २१ वर्षे धंदा डिलीव्हरी बॉय रा. हनुमान मंदिरामागे इंदिरा वसाहत औंध पुणे
३) अक्षय शहाजी बोराडे वय २८ वर्षे धंदा – डीलीव्हरी बॉय रा. साईबाबा मंदिराजवळ इंदिरा वसाहत औंध पुणे यांना अटक केली.

आरोपींकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता नमुद आरोपींनी सदर गुन्हा केला असल्याचे सांगितले. नमुद गुन्ह्यातील अटक आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी आरोपी साहिल अशोक माने याचे निवेदन पंचनाम्याने चोरीस गेलेल्या बॅटऱ्या या आरोपीतांकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत. आरोपी साहील माने, अक्षय बोराडे याचे कडून चोरीच्या बॅट-या विकून प्राप्त केलेले सोळा हजार रुपये सुध्दा जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सहा पोलिस निरीक्षक के बी डाबेराव हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, रंजन कुमार शर्मा, पोलिस सह आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, चुलूमुला रजनिकांत, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर, विठ्ठल दबडे, सहा. पोलिस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर, यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग, सपोनि के.बी डाबेराव, गणेश रायकर, पोहवा २३४३ गणेश गायकवाड, पोहवा ६७०१ बाबा आहेर, पोहवा ६६७४ किसन शिंगे, पोहवा ७३५६ संदेश निकाळजे, पोशि ८१४५ अतुल इंगळे, पोशि १०४०४ खरात, पोशि २४४१ गजानन अवातिरक, पोशि ४५१ शरद राऊत, पोशि २३९५ स्वप्नील मराठे, पोशि ९८९ गणेश भोईने, पोशि १३४६ समीर पवार सर्व नेमणुक बाणेर पोलिस ठाणे पुणे शहर यांनी केली आहे.

पुणे! बाणेर पोलिसांनी ७२ सीसीटीव्ही फुटेज तपासत चार आरोपींना केले जेरबंद…

पुणे शहरात बाणेर टेकडीवर महिलांना जबरदस्तीने लुटणारी टोळी जेरबंद…

पुणे शहरात कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून हत्या…

Video! पुणे जिल्ह्यात टोळक्याने युवकाला बोनेटवरुन फरफटत नेलं अन्…

पुणे! युवकानं PMPML बस का पळवली? पोलिस तपासात धक्कादायक माहिती…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!