मुंबई! कलिंगड खाऊन 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट…

मुंबई: दक्षिण मुंबईमधील पायधूनी परिसरातील घाटी गल्ली येथील मुघल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

अब्दुल्ला डोकाडिया (वय 40), नसरीन डोकाडिया (वय 35) आणि त्यांच्या मुली आयशा (वय 16) व झैनब (वय 13) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मृत अब्दुल्ला डोकाडिया एका प्रकरणात साक्षीदार होता. डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पाच दिवस उलटूनही मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सध्या तरी कोणताही संशयास्पद मुद्दा आढळलेला नाही. त्यामुळे पोलीस सगळ्या बाजून तपास करत आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत अब्दुल्ला डोकाडिया हा एका प्रकरणात साक्षीदार होता. 2019 साली डी एन नगर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली होती. जोगेश्वरीतील एका विकासकला एका महिलेने पैसे दिले होते. विकासकाने पैसे घेण्यास अब्दुल्ला यांना पाठवलं होते. नंतर ते पैसे विकासाकाने परत दिले नाही. महिलेने 2019 साली या प्रकरणी डी एन नगर पोलीस स्टेशनला फसवणूकीची तक्रार दाखल केली. या प्रकरणात अब्दुल्ला हे साक्षीदार होते आणि त्यांची साक्ष महत्वाची ठरणार होती. 2026 साली या प्रकरणाची सुनावणी होणार होती.

दरम्यान, या प्रकरणाचा शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम रिपोर्ट) अहवाल समोर आला आहे. मात्र समोर आलेल्या अहवालातून कारण स्पष्ट होण्याऐवजी मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण (निरीक्षण) पेंडिंग असं लिहलं आहे. त्यामुळे या प्रकरणात फॉरेन्सिकच्या अहवालानंतर कारण स्पष्ट होणार आहे. – फॉरेन्सिकचा अहवालाचा जेजे रुग्णालयातील अधिकारी अभ्यास करणार आणि त्यानंतरच होणार मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे.

बिर्याणीनंतर रात्री कलिंगड खाल्लं अन् कुटुंबातील चौघांचा मृत्यू…

महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला अडकवलं सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अन्…

मुंबईत Live कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस, युवक-युवतीचा मृत्यू…

नवी मुंबईतील पोलिस हवालदाराचं भयंकर कृत्य; प्रियकराला संपवलं अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!