संतापाची लाट! नसरापुरातील आरोपीने कोंबड्या, बकऱ्यांनाही सोडले नाही…

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीच्या हत्या प्रकरणात आता एक संतापजनक माहिती समोर आली आहे. साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्यानंतर, नराधम आरोपी भीमराव कांबळे हा कोणताही पश्चात्ताप न दाखवता चक्क गावकऱ्यांसोबतच मुलीचा शोध घेत होता. त्याच्या या कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या आजीने शोध सुरू केला, ज्यामध्ये गावातील नागरिकही मदतीला धावले. या शोधकार्यात आरोपी भीमराव कांबळे स्वतः हजर राहून आपण निर्दोष असल्याचे भासवत होता. शोध सुरू असताना काही ग्रामस्थांनी त्याला प्रश्न विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या वागण्यातील संशयास्पद हालचाली पाहून नागरिकांनी तातडीने पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी संशयावरून आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला बनाव करणाऱ्या भीमराव कांबळे याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कृत्याची कबुली दिली.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

आरोपीने आधी ‘गाठी-शेव’ आणि ‘वासरू’ दाखवण्याचे आमिष दाखवून मुलीला गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून पुरावे नष्ट करण्यासाठी तिची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तो बराच वेळ पीडितेच्या नातेवाईकांसोबतच वावरत होता, हे तपासातून स्पष्ट झाले आहे.

आरोपीला ७ मे पर्यंत पोलीस कोठडीत असून, अशा क्रूर गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. इतकी अमानुष कृत्ये करूनही आरोपीने न्यायालयात “मला केवळ किरकोळ मारामारीसाठी या प्रकरणात गोवण्यात आले आहे,” असा दावा केला आहे.

दरम्यान, नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला 20 वर्षापूर्वीच त्याच्या मुळगावातून हकललं होतं, अशी माहिती समोर आली आहे. आरोपी भीमराव कांबळे हा मुळचा भोरच्या साळवडे गावचा होता. आरोपीवर 1998 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये विनयभंगाचे दोन गुन्हे होते. त्यानंतर देखील त्याने गावातील अनेक महिलांना टार्गेट केले आणि त्याच्यासोबत आक्षेपार्ह वर्तवणूक केली होती. त्यामुळे अख्खं गाव त्याच्यावर भडकले होते. एवढंच काय तर आरोपीने कोंबड्या, बकऱ्यांना देखील सोडले नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी एकमताने निर्णय घेऊन त्याच्यावर गावबंदी घातली होती. त्याला गावाबाहेर काढण्यात आले होते.

गावाबाहेर काढल्यानंतर तो वेठबिगारी करत होता. 2015 मध्ये देखील त्याच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मागील दोन तीन वर्षापूर्वी त्याची पत्नी आणि मुलगा साळवडे गावात परतले होते. नराधमाच्या कुटूंबाला पुन्हा गावाबाहेर काढण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पण चिमुकलीचा जेव्हा शोध सुरू होता, तेव्हा आरोपी शोधकार्यात होता, अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र दिनी पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर ठेचून केली हत्या…

पुणे! आळंदीत चिमुकली आणि वृद्ध महिलेची निर्घृण हत्या…

सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी बापाने घेतला चिमुकलीचा बळी…

पुणे! चिमुकली पाळण्यात निपचित पडलेली तर पत्नीच्या गळ्याला दोर…

महाराष्ट्र हादरला! चिमुकलीवर अत्याचार करून डोकं ठेचलं; मृतदेह पाहून आक्रोश…

बीड हादरलं! बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला लटकलेल्या अवस्थेत, वडिलांचा मृतदेह…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!