
पुणे शहरात बनावट नोटा छापणा-या टोळीचा सायबर पथकाकडून पर्दाफाश…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात बनावट नोटा छापणा-या टोळीचा शिवाजीनगर पोलिस स्टेशनकडील सायबर पथकाकडून पर्दाफाश करण्यात आला असून, मोठया प्रमाणात बनावट नोटा व नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिवाजीनगर पोलिस स्टेशन पुणे शहर येथे २७/०४/२०२५ रोजी कोटक महिंद्रा बँकेचे मनेजर यांनी फिर्याद दिली की, त्याचे बँकेचे सीडीएम मशिन मध्ये २०० रूपये दराच्या ५५ बनावट नोटा जमा करण्यात आले आहेत. अशा फिर्याद वरून शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. ५९ / २०२५ भा. न्या. स कलम १७८, १७९, १८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा दाखल होताच पोलिस तपास पथक गठीत करून त्वरीत तांत्रिक विश्लेषण करले. आरोपींचा शोध घेवून आरोपी
मनिषा स्वप्निल ठाणेकर, नागपुर चाळ, येरवडा, पुणे,
भारती तानाजी गवंड रा मोर्या गोसावी, राजपाल सी-१०, केशवनगर, चिंचवड,
सचिन रामचंद्र यमगर, वय ३५ रा गहुंजे, पुणे, यांना दि. १८/०४/२०२५ रोजी अटक करण्यात आले.
आरोपींकडे कसून तपास केला असता नमुद आरोपींनी सदरच्या नोटा कोल्हे नावाच्या व्यक्तीकडून प्राप्त केले असल्याचे समजले. कोल्हे नावाच्या इसमाबाबत अधिक माहिती प्राप्त केले असता त्याचे नाव नरेश भिमप्पा शेट्टी (रा लोहगाव, पुणे) असे असल्याचे निष्पन्न झाले असता सदर इसमाचे घरी छापा टाकला असता त्याचे घरामध्ये २००/- रुपये दराचे बनावट नोटांचे २० बंडल ज्याचे बजारातील मुल्य ४,००,०००/- रुपये, ख-या नोटा २,०४,०००/- रुपये, नोटा छापण्याचे प्रिंटर, ५००/- रुपये दराच्या ए४ साईजचे १,११६ कागदांवर प्रत्येक कागदावर ४ नोटा या प्रमाणे एकुण २,२३२ प्रिंट केलेल्या नोटा ज्याचे बाजाराती मुल्य २२,३२,०००/- रुपये, नोटा प्रिंट करण्यास वापरण्यात येणारी शाई, नोटा छापण्याचे कोरे कागद व इतर साहित्य तसेच नमुद आरोपीचे कार क्रं एमएच १२ डब्ल्यु के ३७६१ मधुन बनावट २००/- दाराच्या ६४८ नोटा व तसेच ५०० रुपये ३ बनावट नोटा ज्यांची बाजारातील किंमत १,३९,१००/- रुपये जप्त केले.
या गुन्हयातील इतर आरोपी भारती गवंडकडून २००/- रुपये दराच्या ६०,०००/- रुपये किंमतीच्या नोटा आरोपी मनिषा ठाणेकर (पाटील) यांचे कडून बनावट २००/- दराच्या २०,०००/- रुपयांच्या नोटा, सचिन यमगर यांचे कडुन २००/- दराच्या २०,०००/- रुपयांच्या नोटा, असे साहित्य जप्त केले. आरोपी नामे नरेश शेटटी यांचे अधिक तपास केले असता सदर गुन्हयामध्ये त्यास आरोपी प्रभू गुगलजेडडी याने मदत केली असल्याचे तांत्रिक विश्लेषनावरून त्यास देखिल अटक करण्यात आली. सदर आरोपी कडून २००/- दराच्या ३,०००/- रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयातील सर्व आरोपीतांचा दि २९/०४/२०२५ पर्यंत पोलिस कोठडी रिंमाड घेण्यात आले असून आज पर्यंत गुन्हयातील सर्व आरोपीताकडून एकुण २८,६६,१००/- रुपयांचे २०० व ५०० रुपयांचे बनावट नोटा व २,०४,०००/- रुपयांच्या ख-या नोटा व इतर साहित्य गुन्हयात वापरलेल्या कारसह जप्त करण्यात आले आहे. गुन्हयातील नोटा छापण्यास वापरण्यात आलेले लॅपटॉपमालक तसेच इतर आरोपीतांचे नावे निष्पन्न झाले असून त्यांचा कसोशीने शोध सूरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलिस आयुक्त, रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविण पाटील, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-१, संदिपसिंह गिल्ल, सहा पोलिस आयुक्त, साईनाथ ठोंबरे, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक (गुन्हे), चंद्रकांत सुर्यवंशी, सहा पोलिस निरीक्षक के बी डाबेराव, पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, पोलिस अंमलदार नलिनी क्षिरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, श्रीकृष्ण सांगवे, प्रविण दडस, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख (एटीसी) यांनी केली आहे.
पुणे शहरातील खडी क्रशींगमधील मोटारी चोरणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या…
पुणे शहरात युवकाचा खून करणाऱ्या आरोपींना २४ तासाच्या आत सोलापूर येथून केले जेरबंद…
पुणे! स्वारगेट पोलिसांनी सराईत गुन्हेगारास केले जेरबंद…
पुणे! आईने 10 वर्षांनी झालेल्या दोन चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं अन्…
Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…

