पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या लागलेल्या आगीत सात महिलांचा मृत्यू….

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील तळवडे एमआयडीसीत असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत सात महिलांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवार) घडली आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस दाखल झाले आहेत.

अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून, सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आत्तापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. वाढदिवसाला लावण्यात येणाऱ्या स्पार्कल्सचा हा कारखाना होता. या लागलेल्या आगीत कारखान्यातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे. वाढदिवसाच्या केक वर लावण्यात येणाऱ्या फुलझडी मेणबत्ती बनवण्याचा कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये 7 महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. या कारखान्यात जवळपास 20 ते 25 कामगार काम करत होते. मात्र दुपारच्या सुमारात आग लागली आणि कामगारांनी आरडा ओरड सुरु करत या कारखान्यातून बाहेर पडले. मात्र, सात महिला आगीतून स्वत:चा बचाव करण्यात अपयशी ठरल्या आणि त्यांचा होरपळून मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे…
उषा पाडवी (वय- 40)
कविता राठोड (वय-35)
रेणुका तातोड (वय-20)
कमल चोरे (वय-35)
शरद सुतार (वय-50)
प्रियंका यादव (वय-32)
सुमन राधा (वय-40)
अपेक्षा तोरणे (वय-18)

Video: मुंबईत इमारतीला भीषण आग; दोन जणांचा होरपळून मृत्यू…

मुंबईमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग; सात जणांचा होरपळून मृत्यू…

समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…

पुणे शहरात लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याचा कारच्या धडकेत मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!