पुणे शहरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे, दोघांना अटक…

पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवारी (ता. १४) ‘पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोंढवा परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरु आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही व्यक्ती बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सोमवारी रात्रीच्या सुमारास ते दोघे पाकिस्तान जिदाबादच्या घोषणा देत होते. त्यावेळी तेथून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्यांनी दिलेल्या घोषणा ऐकल्या. त्यांनी तात्काळ कोंढवा पोलिसांना याबाबत माहिती दिली. कोंढवा पोलिसांनी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक केली आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

विमानाने पुण्यात येवून घरफोडी करणारे जेरबंद…

पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचे कारणही समोर…

पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…

पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी घडामोड; वाहनात आढळला शस्त्रसाठा…

पुणे दहशतवादी प्रकरण : भूलतज्ञ डॉक्टर युवकांना ओढायचा ISISच्या जाळ्यात अन्…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!