
मुंबई! विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…
मुंबई: दादरमधील एका हायप्रोफाईल शाळेतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. यानंतर संबंधित शिक्षिकेला अटक करण्यात आली असून, आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे.
शिक्षिकेने जामीन मिळवण्यासाठी केलेल्या अर्जात विद्यार्थीच प्रेमात होता असे पुरावे कोर्टात सादर केले आहेत. अटकेत असलेल्या शिक्षिकेने जामीन मिळवण्यासाठी अल्पवयीन मुलाने पाठवलेले प्रेमपत्र आणि चॅटिंग कोर्टात सादर केले आहेत. त्यामुळे सदर प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. शिक्षिकेने कोर्टात आपल्या अर्जात म्हटले की, ‘विद्यार्थ्यासोबत तात्पूरत्या प्रेमसबंधात होती. अल्पवयीन विद्यार्थी तिला पत्नी असे म्हणायचा. किकी आणि पुकी या नावाने शिक्षकेला बोलवायचा असे मेसेज आरोपी शिक्षिकेने कोर्टात सादर केले आहेत.’
मुंबईत शिक्षिकेने विद्यार्थ्याला दारू पाजून करत राहिली लैंगिक अत्याचार…
शिक्षिकेने या अल्पवयीन विद्यार्थ्याला वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केलाचा आरोप तिच्यावर आहे. शिक्षिका सध्या अटकेत असून तिच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल आहे. मात्र आता शिक्षिकेने कोर्टात सादर केलेल्या बाबींमुळे या प्रकरणात वेगळा ट्विस्ट आला आहे.
दरम्यान, शिक्षिका (वय 40) विवाहित असून तिला एक मूल आहे. पीडित विद्यार्थी 11 वीत शिकत होता आणि तो 16 वर्षांचा होता. तक्रारीत म्हटले आहे की, डिसेंबर 2023 मध्ये हायस्कूलच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्याच्या अनेक वेळा संपर्कात आली. त्यानंतरच ती त्याच्याकडे आकर्षित झाली. शाळेतील तिच्या एका महिला मैत्रिणीची मदत घेतली आणि प्रकरण पुढे नेले. या प्रकरणी महिला मैत्रिणीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने पीडित विद्यार्थ्याला सांगितले की ते एकमेकांसाठी बनले आहेत आणि वयस्कर महिला आणि मुलांमधील संबंध सामान्य आहेत. एका मित्राशी बोलल्यानंतर, विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला.
शिक्षिका विद्यार्थ्याला तिच्या कारमधून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेली आणि जबरदस्तीने त्याचे कपडे काढले आणि त्याचा विनयभंग केला. तो म्हणाला, ‘पुढील काही दिवसांत, विद्यार्थ्याला त्रास होऊ लागला, म्हणून त्याला तिने गोळ्याही दिल्या. यानंतर, शिक्षिका विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जाऊ लागली. त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले, असे तक्रारीत म्हटले आहे. मात्र आता शिक्षिकेने कोर्टात सादर केलेल्या बाबींमुळे या प्रकरणात वेगळा ट्विस्ट आलेला आहे.
शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्यापासून राहिली गरोदर अन् काढला पळ…
धक्कादायक! मुंबईतील महाविद्यालयात युवतीचा मृत्यू; हत्या की आत्महत्या…
नवी मुंबईत धावत्या बसमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या दोघांना शिक्षा…
पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…
सातारा! विवाहितेच्या मृत्यूमागचं गुढ उकललं; प्रेमविवाह अन् पुन्हा प्रेम…
प्रेम प्रकरण! फोन सायलेंट मोडवर अन् प्रेयसीचा झाला मोठा गैरसमज…

