धक्कादायक! राजगडावर अजयचा मृतदेह पाहून मित्र घाबरले…

पुणे : राजगडावर फिरायला आलेल्या पर्यटकाचा गडावरील पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय मोहनन कल्लामपारा (वय ३३, रा. भिवंडी, ठाणे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

किल्ल्यावरील पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून अजयचा मृत्यू झाला. टाकीतील पाणी काढण्यासाठी गेला असता तोल जाऊन अजय पाण्यात पडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आला आहे. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस हवालदार योगेश जाधव पुढील तपास करत आहेत.

भिवंडी येथील चार युवक वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड येथे फिरायला आले होते. चौघेही रात्री पद्मावती माचीवरील पद्मावती मंदिराजवळ एका तंबू ठोकून मुक्कामाला होते. पहाटे अजयला जाग आली आणि तो पाण्याची बाटली घेऊन पद्मावती तळ्याजवळ पाणी आणायला गेला होता. मात्र, पाणी काढताना तो तोल जाऊन पाण्यात पडला. सकाळी मित्रांना जाग आली तेव्हा अजय तंबूत नव्हता.

मित्रांनी गडावर खूप शोधाशोध केली. मात्र तो कुठेही सापडला नाही. यानंतर तलावाजवळ पाण्याची बाटली आणि चप्पल दिसली. मित्रांनी तलावाजवळ जाऊन पाहिले तर अजयचा मृतदेह पाण्यात तरंगत होता. मृतदेह पाहून मित्र घाबरले. याचदरम्यान आज (मंगळवार) स्वातंत्रदिन असल्याने सकाळी गडावर ध्वजारोहणासाठी वेल्हा पोलिस ठाण्याचे जवान युवराज सोमवंशी, स्थानिक पाहरेकरी बापू साबळे, आकाश कचरे, योगेश दरडिगे, विशाल पिलवारे यांना याबाबतची माहिती समजली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढत गडावरुन खाली आणण्यात आला.

दरम्यान, अजय हा टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीत काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या अचानक जाण्याने मित्रांसह परिवारावर मोठी शोककळा पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! प्रेम प्रकरणातून युवकाला जखमी अवस्थेतच फेकले विहिरीत अन्…

नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे वाढले गूढ; संशय बळावला…

पुण्यातून कोकणात फिरायला जाताना कार धरणात बुडाली; युवतीसह तिघांचा मृत्यू

हृदद्रावक! सुसाईड नोटमधील ऐकून कुटुंबाला झाले अश्रू अनावर…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!