…अखेर भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचं गुढ उलगडलं

नागपूर: भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचे गुढ उलगडले आहे. प्रमुख संशयित आरोपी अमित साहू याला नागपूर पोलिसांनी जबलपूरमधून अटक करून नागपुरात आणले आहे. अमित साहू हा सना खान यांचा पती असून त्याने सना खान यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

अमित साहू याने सना खान यांचा खून केल्यानंतर मृतदेह हिरण नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान दिली. पण, सना खान यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. भारतीय जनता युवा मोर्च्याच्या पदाधिकारी सना खान 1 ऑगस्टला अमित शाहू याला भेटायला जबलपूरला गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या.

जबलपूर मध्ये हिरण नदीमध्ये मेरेगाव जवळ अमित साहू आणि त्याचा मित्र राजेश सिंह यांनी सना खान यांचा मृतदेह नदीत फेकला आहे. त्याच ठिकाणी सध्या जबलपूर पोलीस, नागपूर पोलीस आणि एसडीआरएफ ची टीम नदीमध्ये सना खान यांचा मृतदेह शोधत आहेत. पण अजून मृतदेह मिळालेले नाही.

दरम्यान, भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान या बेपत्ता झाल्या होत्या. 1 ऑगस्ट रोजी अमित साहू याच्या सोबत व्हिडीओ कॉलवर भांडण झालं. त्यानंतर सना त्याच रात्री तातडीने अखेरच्या बसने जबलपूरला गेल्या होत्या. अमित साहू आणि सना खान यांची मैत्री होती. अमित साहू हा जबलपूरमधील एक हॉटेल व्यावसायिक आहे. सना खान आणि अमित साहून या दोघांनी लग्न केले असल्याचे समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात गुन्हा दाखल; नोकराने सांगितले की…

महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्या मध्य प्रदेशमधून बेपत्ता…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!