पिता-पुत्राच्या संशयास्पद मृत्यूनंतर धक्कादायक माहिती आली पुढे…

जळगाव: शिवणी (ता. भडगाव) येथे संजय साहेबराव चव्हाण (वय ४८) आणि कौशिक संजय चव्हाण (वय १२) या पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २७ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणाच्या चौकशी दरम्यान जन्मदात्या बापानेच मुलाचा गळा आवळून खून करून नंतर स्वतःही गळफास आत्महत्या केल्याची माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील रहिवासी असलेले संजय साहेबराव चव्हाण हे त्यांच्या पत्नीला भाऊ नसल्याने सासुरवाडीला शिवणी येथे स्थायिक झाले होते. पत्नी साधनाबाई आणि दोन मुले असा संजय चव्हाण यांचा परिवार आहे. संजय चव्हाण यांचा मोठा मुलगा औषधशास्त्राचे शिक्षण घेऊन इंदोर येथे नोकरी करत आहे. लहान मुलगा कौशीक ऊर्फ समर्थ हा इयत्ता सहावीत शिकत होता.

संजय चव्हाण यांनी २७ जुलै रोजी शेतामध्ये काम असल्याचे सांगून मुलाला सोबत घेऊन गेले होते. पत्नी साधनाबाई यांना शेतात गेल्यानंतर झाडाला पती गळफास घेतलेल्या अवस्थेत तर मुलगा शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या खाटेवर निपचित पडलेला दिसला. याबाबत भडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी आता पोलिस चौकशीत साक्षीदार यांच्या जबाबावरून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कौशिक हा घरातून पैसे घेत असल्याने आणि सारखा उलट उत्तरे देत असल्याचा राग वडील संजय यांना आला होता. त्यामुळे संजय यांनी कौशिक याला शेतात घेऊन गेले आणि रागातून त्याचा गळा दाबून त्याला ठार मारले. यानंतर स्वतः झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांच्या फिर्यादीवरून मृत्युमुखी पडलेल्या बापाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहेत.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला खून अन् मृतदेह लपवला…

डॉ. आदिनाथ पाटीलने स्वतःला इंजेक्शन घेऊन घेतला जगाचा निरोप…

आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला बापाने उचलले अन्…

अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!