पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीतील सागर दत्ता चांदणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर १० साथीदार यांचे विरुध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मकोका अंतर्गत केलेली ही ७४ वी कारवाई आहे.

फिर्यादी हे त्यांचे मित्रांसह चतुःश्रृंगी माता मंदिर येथे तोरण अर्पण करुन घरी जात असताना फिर्यादी यांना सागर दत्ता चांदणे व त्याचे इतर १० साथीदार यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन ‘थांब तुझा मर्डर करतो’ असे म्हणून त्याचे हातातील धारधार शस्त्राने फिर्यादी यांना जीवे मारणेच्या उददेशाने फिर्यादी यांचे डोक्यात वार करुन त्यांना गंभीर जखमी केले व हातामधील शस्त्र हवेत फिरवून कोण मध्ये पडला तर त्याला पण मारून टाकेन असे बोलून धमकी दिली त्याबाबत चतुःशृंगी पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गु.रजि. नं.७५१/२०२३ भा.दं.वि.स.कलम ३०७,३२३,१४१, १४३, १४४, १४७, १४८, १४९ सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान यातील निषन्न आरोपी
१) सागर दत्ता चांदणे, वय २४ वर्ष, रा खडकी बाजार पुणे (टोळी प्रमुख)
२) यश ऊर्फ मोन्या प्रविण गोपनारायण, वय १९ वर्ष, रा खडकी बाजार पुणे
३) ऋषी किरण बिवाल, वय १९ वर्ष, रा. खडकी बाजार पुणे
४) आयुष ऊर्फ बंटया नागेश लांडगे, वय १९ वर्ष रा. खडकी बाजार, पुणे. (टोळी सदस्य) यांना अटक करण्यात आली असुन इतर सात पाहिजे आरोपीचा शोध सुरु आहे. वरील आरोपीचे पुर्व रेकॉर्ड पाहणी करीता आरोपी सागर दत्ता चांदणे (टोळी प्रमुख) व त्याचे साथीदारासह त्याने बेकायदेशीर मार्गाने अवैध आर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने, भोसरी व चतुःश्रृंगी या भागात आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करणेचे उददेशाने गुन्हयातील साथीदार आरोपीतांना स्वतःबरोबर घेवून स्वतःचे अधिपत्याखाली आपली संघटित गुन्हेगारी टोळी स्थापन केलेली आहे. सदर भागातील लोकांना मारहाण करुन दहशत निर्माण करणे, लुटालुट करणे, त्यांचे विरूध्द मालाविरुद्धचे तसेच शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत यातील नमुद सदस्यांवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१)(ii).३ (२) ३ (४) अर्तभाव करणे कामी चतुःशृंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी पोलिस उपायुक्त परिमंडळ ०४ पुणे शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करुन चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि क्र ७५१ /२०२३ भा.दं.वि.स.कलम ३०७, ३२३, १४१, १४३,१४४, १४७, १४८, १४९ सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१)(ii).३(२)३(४) अर्तंभाव करण्याची अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त, खडकी विभाग पुणे शहर आरती बनसोडे ह्या करीत आहेत.

सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार, सह-पोलिस आयुक्त संदिप कर्णीक, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा, पोलिस उप-आयुक्त परी – ४ पुणे शहर शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदशनाखाली चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलिस निरीक्षक गुन्हे, अंकुश चिंतामण, जगन्नाथ जानकर, निगराणी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड, पो. उपनिरीक्षक सचिन गाडेकर, पोलिस अमंलदार अमित गद्रे व सुहास पवार यांनी केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलिस आयुक्तालय पुणे शहराचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ७४ वी कारवाई आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!