लाल दिव्याची गाडी आणि सायरन वाजवत आले अन् साडेचार कोटी लुटले; पण…

वर्धा : वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर बंदुकीच्या धाकावर तब्बल साडेचार कोटी रुपयांची लूट केल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या 5 तासांतच गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

कारसह साडेचार कोटी पळवणाऱ्या गुन्हेगारांना अवघ्या 5 तासांत जेरबंद करण्यात वर्धा पोलिसांना यश आलं आहे. या कारवाईत 3 कोटी 26 लाख रुपये हस्तगत करत वाहनही ताब्यात घेतलं आहे. तर 5 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या या दबंग कामगिरीनंतर 50 हजारांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे.

गुजरातचे व्यापारी कमलेश शहा यांच्याकडे चालक म्हणून काम करणाऱ्या अठ्ठेसिंग सोलंके हा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नागपूर कार्यालयात काम करत आहे. नागपूर कार्यालयाचे नितीन जोशी यांच्याकडून 4 कोटी 52 लाख रुपये घेवून सोलंके हा कारने नागपूर येथून हैद्राबादकडे निघाला होता. वाटेत समुद्रपूर तालुक्यातील पोहणा येथे एक कार सायरन वाजवीत त्यांच्या मागे आली. त्यातून चार लोक उतरले. या चौघांनी प्लास्टिकच्या काठ्यांनी दरडावून सोळंके यास गाडीतून खाली खेचले आणि मारहाण सुरू केली.

सोलंके याच्या डोक्यावर बंदूक ताणत धमकी दिल्याने साडेचार कोटी रक्कम दिली. त्यानंतर चौघेही कारने पसार झाले. सोलंके याने तत्काळ याबाबतची माहिती वडनेर पोलीसांना दिली. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी तपास पथक सज्ज केले. या दहा पथकांनी लगतच्या जिल्ह्यात शोध सुरू केला. अवघ्या पाच तासात तीन आरोपी ताब्यात घेतले. पोलिसांनी तीन कोटी 46 लाख 50 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पाच जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कारवाईत 100 पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या 15 पथकांनी या प्रकरणाचा छडा लावला. वर्धा पोलिसांनी अल्प वेळेत वेगवान कारवाई केल्याने सर्वजण कौतुक करत आहेत.

वर्धा पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे तपास पथकाला 50 हजारांचा रिवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. आरोपींना नागपूरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. याकरिता नागपूर, अमरावती येथील पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळाले. नागपूरहून हैद्राबादकडे जात असताना पोहणा शिवारात ही घटना घडली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वर्धा जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन…

वर्धा पोलिसांना सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषणासाठीचे बक्षिस…

वर्धा पोलिसांचे पथक लपत छपत गेले अन् १७ जणांना रंगेहाथ पकडले; पाहा नावे…

वर्धा जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!