धुळे शहरात मित्रानेच केला मित्राचा किरकोळ वादातून खून…

धुळे : धुळे शहरात मित्रानेच मित्राचा किरकोळ वादातून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

धुळे शहरातील चितोड रोड परिसरात राहणाऱ्या गौरव माने (वय २५) या युवकाचा मित्रानेच किरकोळ वादातून धारदार शस्त्राने खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी हत्याप्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या जयेश पाकळे या युवकाचा शोध घेतला असता तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील 28 नंबर शाळेसमोर एका सिमकार्ड विक्रेत्याला गौरव माने हा दारू पिण्यासाठी पैसे मागत होता, त्यावेळी त्याला त्याचाच मित्र जयेश वाकडे याने सिम कार्ड विक्रेत्याला त्रास देऊ नको असे म्हणत समज दिली. यावरुन दोन मित्रांमध्येच भांडण सुरू झाले. सिमकार्ड विक्रेत्याला पैसे मागणाऱ्या गौरव माने याने मित्र जयेश पाकळे याला व त्याच्या भावाला शिवीगाळ केली. या किरकोळ वादातून जयेश पाकळे याने धारदार शस्त्राने गौरव मानेवर वार करत त्याचा खून केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, धुळे शहर पोलिस संशयीत आरोपी असलेल्या जयेश पाकळे व त्याच्या भावाचा शोध घेत आहेत. खुनाच्या घटनेनंतर आरोपी व त्याचा भाऊ घटनास्थळावरुन पसार झाले असून, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर फेक, चौकशी समितीचा पोलिसांवर ठपका…

पुण्यात एअर होस्टेस युवतीला लॉजवर घेऊन जात केला अत्याचार…

सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याचा रागातून जावयाला क्रूरपणे संपवलं…

सैफ अली खानवरील हल्लेखोराने पोलिसांना सांगितला ओलीस ठेवण्याचा ‘मास्टरप्लान’…

पुणे शहरातील डॉक्टर युवतीची आत्महत्या; मोठी फसवणूक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!