खडक पोलिसांनी दोन तासात ‘झुरळ्या’ चोरट्याच्या आवळल्या मुसक्या…

पुणे (संदीप कद्रे): एका केक मटेरियलच्या दुकानाचे गल्ल्यातील रोख रक्कम ५,२५,०००/- रुपये चोरी झाल्याची घटना खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीमधील काशेवाडी भागात घडली होती. घरफोडीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत चोरटयास पकडून चोरटयाकडून चोरी केलेली रोख ५,२५,०००/- रक्कम हस्तगत करण्यात खडक पोलिसांना यश आले आहे.

सदर बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हाफिजुर रहेमान कयामुद्दीन अन्सारी (वय ५० वर्षे, धंदा केक मटेरिअल विक्री, रा. गिरनार क्लासिक सोसा, अॅक्सीस बँकेच्या वरती, नानापेठ, पुणे) यांचा केक मटेरियल विक्रीचा व्यवसाय आहे. गेली २५ वर्षांपासुन अशोकनगर कॉलणी, काशेवाडी भवानी पेठ, पुणे येथे रिगल एजन्सी नावाने केक मटेरिअल विक्रीचे होलसेल दुकान आहे. १५/१०/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता ते स्वतः दुकान बंद करुन घरी गेले होते. त्यावेळी आठवडयातील व्यवसायातून जमा झालेली रोख रक्कम रु. ५,२५,०००/- मोजुन दुकानातील ड्रावर मध्ये ठेवली होती तसेच शनिवार व रविवार दोन दिवस बँकेला सुट्टी असल्याने बँकेत रक्कम भरणा केली नव्हती.

१६/१०/२०२३ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ०८.०० वा. दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. ड्रावर मध्ये ठेवलेली रोख रक्कम रु. ५,२५,०००/- मिळून आली नाही. सदरबाबत त्यांनी तात्काळ खडक पोलिस स्टेशन येथे तक्रार दिल्याने त्यांचे तक्रारीवरुन अज्ञात चोरटयाविरोधात खडक पोलिस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ३६२ / २०२३ भा.दं.सं. कलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. घरफोडी सारखा गंभीर गुन्हा घडल्याने त्याचा तपास करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी खडक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल माने यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ सहायक पोलिस निरिक्षक राकेश जाधव व तपास पथकातील अंमलदार, सहायक पोलिस निरिक्षक नितीनकुमार नाईक व पो.ना.७६६१ / तांबोळी, पो.शि.८५०० पांडे, पो.शि.९८०४ शेख यांचे तपास पथक नेमण्यात आले.

तपास पथकातील अंमलदार पो.शि.८९४८ चव्हाण, पो. शि. ९१०२ वाबळे यांना त्यांचे खब-यामार्फत माहिती मिळाली की, काशेवाडी येथे राहणारा झुरळ्या ऊर्फ आकाश पाटोळे याने रात्री अशोकनगर कॉलनीत चोरी केली असून तो पळून जाण्याच्या तयारीत आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ वरील दोन पथकांमार्फत त्या ठिकाणी जावुन सापळा रचला. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे (वय २७ वर्षे, धंदा मजुरी, रा. अंजुमन मस्जीद शेजारी, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) यास दत्तमंदीराजवळील सार्वजनिक शौचालयाजवळुन ताब्यात घेवून गुन्हयात अटक करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून गुन्हयात चोरी करुन नेवून लपवून ठेवलेली रोख रक्कम रू. ५,२५,०००/- हस्तगत करण्यात आली. आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असुन नमुद घरफोडी ची तक्रार प्राप्त झाल्यांनतर अवघ्या दोन तासांतच चोरी केलेल्या संपुर्ण मुद्देमालासह आरोपीच्या मुसक्या आवळण्यात खडक पोलिसांना यश आले आहे.

संबंधित कारवाई ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, प्रविण पाटील, अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, संदिपसिंह गिल, पोलिस उप आयुक्त परिमंडळ १ व अशोक धुमाळ, सहा पोलिस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलिस स्टेशनचे सुनिल माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संपतराव राऊत, पोलिस निरीक्षक (गुन्हे), तपास पथक अधिकारी राकेश जाधव सहायक पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक, श्रेणी पो.उप. निरिक्षक अजीज बेग, पोलिस अंमलदार संदिप तळेकर, आशिष चव्हाण, सागर घाडगे, मंगेश गायकवाड, सागर कुडले, अक्षयकुमार वाबळे, रफिक नदाफ, लखन ढावरे, समीर तांबोळी, तेजस पांडे, अश्रफ शेख यांचे पथकाने केली आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे…

एटीएम कार्ड हातचलाखीने घेवून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद…

पुणे शहरात आरोपी नशा भागविण्यासाठी करायचा मोबाईल चोरी; 32 मोबाईल हस्तगत…

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!