
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हातात बॅट घेतली अन्…
नाशिक (संदीप कद्रे) : नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मैदानावर हातात बॅट घेतली आणि दोन चेंडूंवर जोरदार फटकेबाजी केली. निमित्त होते पत्रकार दिनानिमित्त शहर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्याचे. पोलिस आयुक्त संघाने पत्रकार संघावर पाच गडी राखून विजय मिळविला आहे. पोलिस आणि पत्रकारांमध्ये हासत-खेळत स्पर्धा पार पडली.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेनुसार पत्रकार दिनानिमित्ताने पोलिस आयुक्तालय क्रिकेट संघ व पत्रकार क्रिकेट संघ यांच्यात क्रिकेट सामन्याचे शनिवारी (ता.६) सकाळी आयोजन करण्यात आले होते. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मैदानावर हजेरी लावत बॅटींग करत स्पर्धेचे उद्घाटन केले. आयुक्त कर्णिक यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. पोलिस आयुक्त संघाचे कर्णधार व गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पत्रकार संघात इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंन्ट मीडियाच्या प्रतिनिधींचा समावेश होता. संदेश केदारे कर्णधार होते. इम्रान शेख, किरण ताजणे यांनी संघाला जोरदार सुरवात करून दिली. त्यानंतर संदेश केदारे यांनी सर्वाधिक २९ धावांचे योगदान देत जोरदार फटकेबाजी केली. निर्धारित ८ षटकांमध्ये पत्रकार संघाने ७ गड्यांच्या मोबदल्यात ८० धावा केल्या. प्रत्युत्तरात पोलिस आयुक्त संघाकडून मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांनी जोरदार फटकेबाजी केल्याने संघाला विजयी केले. अखेरीस पाच गडी राखून पोलिस आयुक्त संघ विजयी झाला. कर्णधार प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण हे नाबाद राहिले. यावेळी पंच म्हणून नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पंच विशाल लहाने, विक्रांत उदावंत यांनी कामगिरी पार पाडली.
पत्रकार दिनानिमित्त काल पोलिस परेड ग्राऊंडवर सर्व पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते..
मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र या दिवशी सुरू केले होते.
Few visuals from the NASHIK CITY POLICE Vs.… pic.twitter.com/U7Y4DRVP8r
— नाशिक शहर पोलीस – Nashik City Police (@nashikpolice) January 7, 2024
संदीप कर्णिक यांनी स्वीकारला नाशिक पोलिस आयुक्तपदाचा पदभार!
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या व्हॉट्सऍप सेवेला मोठा प्रतिसाद…
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा ‘सुरक्षित नाशिक’ संकल्पनेवर भर…
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू…
पुणेकरांची मनं जिकली! संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

