
संतापजनक! बापाने ३ महिन्यांच्या चिमुकलीला फरशीवर आपटून घेतला जीव…
मुंबई: मुंबईच्या कुर्ला परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीचे पत्नीसोबत झालेल्या वादानंतर आपल्याच ३ महिन्यांच्या चिमुकलीला फरशीवर आदळले. चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडली. मुलीच्या आईनं तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.
परवेझ फकरुद्दीन सिद्दीकी (वय ३६) असे अटक केलेल्या आरोपी बापाचे नाव आहे. तो आपली पत्नी आणि तीन मुलींसह राहत होता. त्याने सर्वात लहान मुलगी आफिया हिचा फरशीवर आपटून खून केला आहे. याप्रकरणी मुलीची आई सबा परवेझ सिद्दीकी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परवेझ हा मागील काही दिवसांपासून बेरोजगार होता. पैसे नसल्याने त्याचे पत्नीसोबत सातत्याने खटके उडत होते. याच कारणातून शनिवारी दुपारी परवेझचा पत्नीसोबत वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर परवेझने पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी ३ महिन्यांची आफिया पत्नी सबा यांच्या कुशीत होती. रागाच्या भरात परवेझने आफियाला पत्नीकडून हिसकावून घेतले आणि फरशीवर आदळले.
या प्रकारानंतर गंभीर जखमी झालेल्या आफियाला तातडीने कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच चिमुकलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
धक्कादायक! पुणे शहराजवळ अंगावर कंटेनर घालत सहकाऱ्याचा घेतला जीव…
पत्नीसोबत होते शेजाऱ्याचे अनैतिक संबंध; सापळा रचला अन् जीव गेला…
हृदयद्रावक! पती-पत्नीचे भांडण अन् जीव गेला दोन चिमुकल्यांचा…
अंबरनाथमध्ये युवकाने सपासप वार करत घेतला युवतीचा जीव…
Video: उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन् गेला जीव…

