पुणे पोलिस आयुक्तांनी ऋषिराज सावंत बाबत दिली महत्त्वाची माहिती…

पुणे: राज्याचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाच्या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, प्रत्यक्षात ऋषिराज सावंत हे आपल्या दोन मित्रांसोबत बँकॉकला गेल्याचे तपासात समोर आले. ऋषिराज सावंत सोमवारी दुपारी पुण्यातील विमानतळावरुन खासगी चार्टर्ड प्लेनने बँकॉकला निघाले होते. मात्र त्याच्या अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांचे चार्टर्ड प्लेन माघारी वळवण्यात आले. त्या घटनेबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात आले होते. याबाबत पुणे पोलिस आयुक्त अमितेकुमार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाची तक्रार ते बँकॉकसाठी निघालेले विमान परत कसे आणण्यात आले. या सर्व घटनाक्रमाचा आम्ही तपास करत आहोत. तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली होती. ती अपहरणाची तक्रार अद्यापपर्यंत मागे घेण्यात आलेली नाही. ऋषिराज सावंत यांचे विमान जर देशाच्या बाहेर गेले असते तर ते वळवणे अवघड झाले असते. ऋषिराज सावंत यांच्या अपहरण संदर्भात तपासात काहीही आढळलेले नाही.’

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

‘ऋषिराज सावंत बिझनेस मिटिंगसाठी बँकॉकला निघाले होते का, हे अद्यापपर्यंत समोर आले नाही. त्या दिवशी तानाजी सावंत आणि त्यांचे कुटुंब घाबरलेल्या अवस्थेत होते. काही घटना घडण्याआधी पुणे पोलिसांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला. विमान वाहतूक प्रशासनाला आम्ही मेल केला होता, त्यानंतर विमान परत आणण्यात आम्हाला यश आले. सध्या आम्ही या सर्व घटनाक्रमाचा तपास करत आहोत,’ असेही पुणे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे.

Tanaji-Sawant-Son
तानाजी सावंत यांच्या मुलाची पुणे पोलिसांनी घेतली झाडाझडती; प्रतिप्रश्न करताच…

तानाजी सावंत यांच्या मुलाचे चार्टर्ड फ्लाईट विमान हवेतूनच माघारी; 68 लाख रुपये खर्च…

राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात ट्विस्ट…

थरारक! चिमुकल्याची अपहरणानंतर सुटका; पोलिसांनी शेतातून काढली आरोपींची वरात…

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

पुणे जिल्ह्यातील डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न…

पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!