
अनैतिक संबंधाच्या संशयावरून चिमुकल्यासमोरच पत्नीचा दाबला गळा…
मुंबई : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीने आपल्या 5 वर्षांच्या मुलासमोर पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मलाबार हिल परिसरात घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
योगिता वेदवंशी असे मृत महिलेचे नाव आहे. योगिता वेदवंशी तिचा पती सुमित आणि 5 वर्षांच्या मुलासोबत मुंबईच्या शिवाजीनगर परिसरात राहत होती. योगिताचे लग्न हे 6 वर्षांपूर्वी झाले होते. सुमित हा योगिताच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. संशयावरून दोघांमध्ये भांडणे होत होती.
सुमित मंगळवारी रात्री दारूच्या नशेत घरी परतला. घरी परतल्यावर पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. या दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून त्यांचा 5 वर्षांचा मुलगा झोपेतून उठला. मात्र, तरीही दोघांमधील वाद थांबला नाही. वाद वाढतच गेल्यानंतर सुमितने पत्नी योगिताचा गळा दाबला आणि यामुळे तिचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक! दत्तक घेतलेल्या मुलासोबतच ठेवले अनैतिक संबंध अन् पुढे…
अनैतिक संबंध! सुनेच्या प्रियकराने सासूच्या तोंडात मारली गोळी…
धक्कादायक! सख्खा चुलत भावाने अनैतिक संबंधातून केला बहिणीचा खून..
दिराचे वहिनीसोबत सुरू होते अनैतिक संबंध भावाला समजले अन् पुढे…
धक्कादायक! पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा गेला जीव…

