हृदयद्रावक! शाळेचे गेट अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू…

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केर्ले गावामध्ये शाळेचं गेट अंगावर पडून सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुसऱ्या एका घटनेत मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच आईनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली.

केर्लेमधील कुमार हायस्कूलमध्ये ही घटना घडली आहे. स्वरूप माने असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सहावीमध्ये शिकत होता. शाळेमध्ये लघूशंकेसाठी जात असताना शाळेचे गेट त्याच्या अंगावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्याला तातडीने रुग्णालयामध्ये तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत दवाखान्यात नेलेल्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आईनेही प्राण सोडल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात घडली आहे. आई व मुलाचा एका तासाच्या अंतराने मृत्यू झाला. या घटनेने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. चंद्राबाई भैरू कांबळे (वय 85) व संभाजी भैरू कांबळे (वय 55) अशी माय-लेकाची नावे आहेत.

आई चंद्राबाई गेली दोन वर्षे अर्धागवायूचा झटका आल्याने अंथरुणावर खिळून होत्या. सोमवारी (ता. 18) छातीत दुखू लागल्याने संभाजी यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या निधनाचे वृत्त समजताच आईनेही प्राण सोडला. एकाच दिवशी माय-लेकाच्या मृत्यूची बातमी समजताच हळहळ व्यक्त होत आहे. संभाजी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, नातू, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

हृदयद्रावक! मळणीयंत्रात डोक्याचे केस अडकल्याने शिर झाले धडावेगळे…

हृदयद्रावक! दिवाळीच्या दिवशी स्वयंचलित दार झाले लॉक; व्यापाऱ्यासह तिघांचा जळून मृत्यू…

हृदयद्रावक! दहावीत 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या…

हृदयद्रावक Video! लेकाला वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगवार पडली, बापाच्या विनवण्या…

हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!