मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर पोलिसांची चाणाक्ष नजर गेली एका बॅगवर अन्…
मुंबई: दादर रेल्वे स्थानकात तुतारी एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांच्या बॅगकडे पोलिसांची चाणाक्ष नजर गेली आणि एका गुन्ह्याची उकल झाली. एक व्यक्ती मोठी ट्रॅव्हल बॅग घेऊन फिरत होता, त्याच्यावर गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानांना संशय आला, म्हणून त्यांनी त्याची झडती घेतली. बॅग उघडताच जवानांना धक्का बसला. या बॅगमध्ये रक्ताने माखलेला एक मृतदेह आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.
दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 11 येथे दोन मूकबधीर व्यक्ती तुतारी एक्सप्रेसमध्ये चढत होते. या दोघांकडे चाकं असलेली एक बॅग होती. मात्र, ही बॅग ट्रेनमध्ये चढवताना या दोघांची दमछाक झाली होती. बॅगेच्या प्रचंड वजनामुळे या दोघांना ही बॅग तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढवताना घाम फुटला होता. त्यावेळी या फलाटावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव आणि पोलिस अंमलदार माधव केंद्रे हे गस्तीवर होते. त्यांना या दोन्ही व्यक्तींची हालचाली बघून संशय आला. त्यामुळे त्यांनी या दोघांना थांबवून बॅग उघडायला सांगितली. ही बॅग उघडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. या बॅगेत रक्ताने माखलेला एक मृतदेह कोंबून ठेवला होता. या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर घाव होते.
पोलिसांनी संबंधित व्यक्ती आणि बॅग ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली. या तपासणीत हा मृतदेह अर्शद अली सादिक अली शेख (वय 30) याचा असल्याचे समजले. अर्शद हा सांताक्रुझच्या कलिना परिसरात राहायला होता. शिवजित सिंग आणि प्रवीण चावडा या दोन मूकबधिरांनी सादिक अली शेख याची हत्या केली. त्यानंतर या दोघांनी त्याच्या मृतदेहाची कोकणात नेऊन विल्हेवाट लावायचे ठरवले होते. त्यासाठी दोघांनी अर्शदचा मृतदेह बॅगेत भरला आणि ते तुतारी एक्स्प्रेसने कोकणात निघाले होते. मात्र, पोलिसांनी संशय येऊन त्यांनी दोघांना हटकल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला.
प्राथमिक तपासात शिवजित सिंह आणि प्रवीण चावडा या दोघांनी मिळून अर्शद अली शेख याची हत्या केल्याचे समजले. शिवजित सिंह घटनास्थळावरुन पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी प्रवीण चावडा याच्याकडून माहिती घेऊन त्याला उल्हासनगरमधून ताब्यात घेतले. गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
यशश्री शिंदे हिच्या हत्येची इनसाईड स्टोरी; आरोपीने सांगितले…
संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…
धक्कादायक Video: पहाटेच्या सुमारास महिलेला पाठीमागून येऊन मारली मिठी…
प्रेमविवाहानंतर दाजीने केला एकुलत्या एका मेव्हण्याचा खून…
कोल्हापुरातील जवानाची अखेर मृत्यूशी झुंज संपली; पत्नी, प्रियकरावर गुन्हा दाखल…
Video: मोबाईल चोराला मिळाले पत्नीचे प्रायव्हेट व्हिडीओ अन् पुढे…