
दाऊद टोळीच्या फरार गँगस्टरला मुंबई पोलिसांनी 29 वर्षानंतर ठोकल्या बेड्या…
मुंबई: कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम टोळीचा 29 वर्षांपासून फरार असलेला गँगस्टर प्रकाश रतीलाल हिंगू (वय 63) याला हुबळी (कर्नाटक) येथून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एनएम जोशी मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चंदनशिवे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ देशमाने यांच्या नेतृत्वात संयुक्त कारवाई करत पोलिसांनी हिंगू याला बेड्या ठोकल्या आहेत.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य असलेला प्रकाश हिंगू मागच्या तीन दशकांपासून कर्नाटकात खोट्या ओळखीने राहत होता. तो मूळचा मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरातील जुहू लेन येथील रहिवासी आहे. प्रकाश हिंगू याला 1996 मध्ये मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आणि नंतर आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. जामिनावर सुटका झाल्यानंतर प्रकाश हिंदू फरार झाला होता. पोलिसांनी अनेक दिवस त्याचा शोध घेतला, पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर कर्नाटकातून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
न्यायालयीन सुनावणीत तो वारंवार गैरहजर राहिल्यामुळे त्याला फरार घोषित केले होते. तेव्हापासून पोलीस हिंगूच्या मागावर होते. पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. एका गोपनीय माहिती देणाऱ्याने हिंगू कर्नाटकातील हुबळी येथे असल्याचे मुंबई पोलिसांना सांगितले. या माहितीची शाहनिशा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला कर्नाटकातून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहे.
कुख्यात गँगस्टर अरुण गवळी कारागृहातून येणार कायमचा बाहेर…
गँगस्टर शरद मोहोळच्या पत्नीला पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या…
मुळशी पॅटर्न! गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमागची INSIDE STORY…
बाबा सिद्दिकी प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिष्णोई याला कॅलिफोर्नियामधून अटक
पुण्यातील गुंड गजा मारणे याला रिल्स बनवणं पडलं महागात…

