हृदयद्रावक! बिबट्या दिसल्याने स्नेहल हिने मारली विहिरीत उडी अन् गेला जीव…

जळगाव : तांबोळे (ता. चाळीसगाव) शिवारात शेतात कापूस वेचणी करत असताना बिबट्या आपल्या दिशेने येईल व हल्ला करेल या भीतीतून शेतातील मजुरांनी गावाकडे धाव घेतली. यावेळी घाबरलेल्या युवतीने विहिरीत उडी मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाणी जास्त असल्याने युवतीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

चाळीसगाव ग्रामीण भागात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकापाठोपाठ हल्ल्याच्या घटना घडत आहेत. बिबटे पिंजऱ्यात अडकत असतानाही शेत शिवारांमध्ये अजूनही बिबट्‍याचे दर्शन होत आहे. तांबोळा येथील शेतकरी विजय विक्रम पाटील यांच्या शेतात १९ नोव्हेंबरला महिला कापूस वेचणीचे काम करीत होत्या. शेतात विजय पाटील यांचा मुलगा व मुलगी स्नेहल देखील होते. सकाळी दहाच्या सुमारास स्नेहल विजय पाटील (वय १८) ही युवती भावासह शेताजवळच्या विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली होती.

स्नेहल हिला अचानक बिबट्या दिसल्याने तिने जोरात आरोळी मारली. त्याचवेळी तिच्या भावाने कापूस वेचणी करणाऱ्या महिलांकडे धाव घेतली. मात्र, स्नेहल विहिरीजवळ असतानाच तिने घाबरून विहिरीत उडी घेतली. हा प्रकार समजताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. परंतु, स्नेहल हिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्नेहलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याबाबत ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्नेहल हिच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हृदयद्रावक! पती-पत्नीचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार…

हृदयद्रावक! शाळेचे गेट अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू…

हृदयद्रावक! मळणीयंत्रात डोक्याचे केस अडकल्याने शिर झाले धडावेगळे…

हृदयद्रावक! दिवाळीच्या दिवशी स्वयंचलित दार झाले लॉक; व्यापाऱ्यासह तिघांचा जळून मृत्यू…

हृदयद्रावक! दहावीत 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या…

हृदयद्रावक Video! लेकाला वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगवार पडली, बापाच्या विनवण्या…

हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!