पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी वादावर दिलं स्पष्टीकरण…

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केल्याने पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर विरोधकांकडून टीका सुरू होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विश्वास नांगरे पाटील यांच्यावर पोस्ट लिहून थेट नोकरीचा राजीनामा देऊन संघात भरती होण्याचा खोचक सल्ला दिला होता. त्यानंतर या सगळ्या वादावर विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिसांनी दिलेली मानवंदना स्वीकारून नागपूरचे मावळते पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. रविंद्र सिंघल यांनी पुष्प गुच्छ देऊन नांगरे पाटील यांचे स्वागत करून त्यांच्या नव्या कारकीर्दीला शुभेच्छा दिल्या. नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत होत असलेल्या टीकेवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “हिंदू संघटनेमार्फत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्या कार्यक्रमात मी जे काही बोललो ते कायद्याच्या चौकटीत आणि नियमांच्या अनुषंगाने बोललो. बोलताना सगळ्या गोष्टी कायद्याच्या कक्षेत बसतील, असेच मी बोललो. मी कुठेही नियमांचा भंग केलेला नाही”.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

नागपूरच्या पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताना नेमकी कोणती आव्हाने वाटतात असे विचारले असता नांगरे पाटील म्हणतात, मी इथे अहोरात्र काम करण्यासाठी आलेलो आहे. रात्री शहरात फिरणे हे माझे पॅशन आहे. पोलिस उपायुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त, सह-पोलिस आयुक्त म्हणून मी मुंबईत काम केले आहे. मुंबईतील आव्हाने आणि नागपूरची आव्हाने अतिशय वेगळी आहे. माझे सहकारी, अधिकारी अतिशय प्रोफेशनल आहेत. आमचे पोलिस महानिरीक्षक सदानंद दाते सर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अतिरिक्त पोलिस आयुक्त बेस्ट रिजनचा म्हणून काम केले आहे. अतिशय प्रामाणिकपणे नागपूर शहराची सेवा करणे हे आमचे काम आहे. हेच काम करण्यासाठी मी नागपूरला आलेलो आहे.

महिलांची सुरक्षितता हे प्रत्येक ठिकाणी काम करताना मोठे आव्हान असते. पोलिस उपस्थित असताना सुरक्षित वाटणे ही बाब भूषणावह नाही. पण पोलिस उपस्थित नसताना माता भगिनींना मुलींना सुरक्षित कसे वाटेल, यासाठी प्रयत्न मी नाशिकला पोलिस आयुक्त असताना, पश्चिम महाराष्ट्राला विशेष पोलिस महानिरीक्षक असताना आणि मुंबईत सह पोलिस आयुक्त असताना १०० निर्भया पथके आम्ही लाँच केलेली होती, असे नांगरे पाटील यांनी नमूद केले.

दरम्यान, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त, देशभक्ती आणि विचारसरणीचे गौरवाने कौतुक केले होते. केशव बळीराम हेडगेवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाचे देखील त्यांनी कौतुक केले होते.

भाकरी पुन्हा करपली! विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने पोस्ट व्हायरल अन् मोठा खुलासा…

IPS विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितला आशाताईंचा किस्सा…

IPS विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून 78 लाख रुपयांना लुटलं…

दादा मिश्किलीने म्हणाले, ‘आयला गडबड झाली, आता चोरांना पॉश लॉक अप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!