माता तू न वैरिणी! पुणे जिल्ह्यात दोन चिमुकल्यांचा झोपेतच दाबला आईने गळा…

पुणेः पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पोटच्या दोन चिमुकल्या लेकरांना आईनेचे पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शंभू दुर्योधन मीढे (वय 1 वर्ष) आणि पियू दुर्योधन मीढे (वय 3 वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत. या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मीढे (वय 35) यांच्यावरही कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केले आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीच्या वादातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, दौंड पोलिसांनी आरोपी कोमल दुर्योधन मिढे (वय ३०) या महिलेला ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

माता तू न वैरिणी! चिमुकलीला 14व्या मजल्यावरून फेकलं…

माता न तू वैरिणी! प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला दगडाने ठेचलं…

माता न तू वैरिणी! आईने चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावला अन्…

माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…

माता न तू वैरिणी! मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!