
पुणे! नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडणारी घटना कॅमेऱ्यात कैद…
पुणे: लोणी काळभोर भागातील एका सोसायटीच्या परिसरात सायकल खेळत असलेल्या एका चिमुकल्याचा कार खाली चिरडून मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.
निष्कर्ष आश्वत स्वामी (वय ५) असे कारच्या धडकेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. निष्कर्षचे वडील आश्वत नारायण स्वामी (वय ४०) हे लोणी काळभोर येथील जॉय नेस्ट सोसायटीमध्ये राहतात. त्यांनी या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुणे: लोणी काळभोर भागातील एका सोसायटीच्या परिसरात सायकल खेळत असलेल्या एका चिमुकल्याचा कार खाली चिरडून मृत्यू झाला आहे.https://t.co/42LUDp7gg7 pic.twitter.com/ubh0qF5Ceo
— policekaka News (@policekaka) January 23, 2026
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्वत स्वामी यांचा मुलगा निष्कर्ष याला घेऊन त्यांची सासू सरस्वती रेड्डी या सोमवारी (ता. १९) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोसायटीच्या आवारात आल्या होत्या. सोसायटीच्या आवारात निष्कर्ष खेळत होता. त्यावेळी सोसायटीच्या आवारातच वेगात आलेल्या कारने त्याला उडवले. चालकाने कार थांबवली तोपर्यंत मुलगा फरफटत गेला. कारचालक घाईत कारमधून उतरला आणि त्याने मुलाला उचलले. त्यानंतर स्वतःच्या कारमध्ये टाकून तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही घटना घडली तेव्हा सोसायटीच्या परिसरात असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली. काही नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
पुणे अपघात! कारला चावी तशीच राहिली अन् 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक…
हृदयद्रावक! साताऱ्यात थरकाप उडवणारा अपघात; शिक्षिकेचा जागीच मृत्यू…
Video: पुणे शहरातील नवले पुलाजवळ नेमका कसा घडला अपघात, ८ जणांचा मृत्यू…
सप्तशृंग गडावर निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात…

