
धक्कादायक! पुणे शहरात हॉर्न वाजवल्यावरून तिघांना फायटर सारख्या शस्त्राने मारहाण…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मुंढवा परिसरात गाडीचा हॉर्न वाजवल्यावरून दोन जणांनी एका कुटुंबाला जबर मारहाण केली आहे. आरोपींनी चालकाला फायटर सारख्या शस्त्राने मारल्यामुळे त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. शिवाय, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पीडित व्यक्तीच्या पत्नीला आणि मुलीला देखील आरोपींनी मारहाण केली आहे.
या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे. शुभम गायकवाड आणि राजू गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. राजेश नाथोबा वाकचौरे (वय ५०, रा. कोरेगाव पार्क, पुणे) सुवर्णा राजेश वाकचौरे आणि संस्कृती राजेश वाकचौरे असे मारहाण झालेल्या कुटुंबाचे नाव आहे.
तक्रारदार राजेश वाकचौरे आपल्या पत्नी सुवर्णा वाकचौरे आणि मुलगी संकृती यांच्यासह गुरुवारी (ता. ९) बाहेर जात होते. मुंढवा येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ हॉर्न वाजवल्यामुळे त्यांचे आरोपींसोबत भांडण झाले. यावेळी मुख्य आरोपी शुभम गायकवाड आणि त्याचे वडील राजू गायकवाड यांनी फायटर सारख्या हत्याराने आणि शस्त्राने राजेश यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी वाकचौरे यांच्या गाडीवर मोठा दगड मारून काच फोडली. राजेश यांना वाचवण्यासाठी आलेली मुलगी संस्कृती आणि त्यांची पत्नी सुवर्णा यांना देखील आरोपींनी बेदम मारहाण केली. आरोपींनी दोघींच्या छातीवर बुक्क्या आणि पोटात लाथा मारल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि डीबीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुख्य आरोपी शुभम गायकवाड आणि त्याचे वडील राजू गायकवाड यांना ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास मुंढवा पोलिस करत आहेत.
पुणे शहरात गुंडाची रॅली काढणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई; काढली धिंड…
अजित पवार यांचा पुणे पोलिसांना कडक इशारा; जमत नसेल तर…
पुणे! IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदा हिला कृष्णाने स्माईल दिली अन्…
पुणे शहरात IT कंपनीतील युवतीवर कोयत्याने वार करून सहकाऱ्याने केला खून…
पुणे! विद्येच्या माहेरघरात मुलींचे कपडे बदलतानाचे Video रेकॉर्डिंग…
पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू…
पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचे कारणही समोर…
Live Video: लवळे-नांदे रोडवर आयटी अभियंता आणि कुटुंबावर जमावाने हल्ला केला…
पुणे! चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेमप्रकरणातून भावाची हत्या…
धक्कादायक! पुणे शहराजवळ कोयत्याने सपासप वार करुन एकाची हत्या…

