
पुणे! IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदा हिला कृष्णाने स्माईल दिली अन्…
पुणे : पुणे शहरातील नामांकित कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये चाकूने झालेल्या हल्ल्यात शुभदा कोदारे (वय 28) या युवतीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शुभदा हिच्या सहकाऱ्यानेच तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. पैशाच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय 28) याला अटक करण्यात आली आहे.
विमाननगर येथील एका कंपनीत काम करत असलेल्या कृष्णा आणि शुभदा या दोघांची 2022 मध्ये ओळख झाली. पुढे दोघांच्या ओळखीचे रुपांतर मैत्री झाले होते. शुभदा हिने वडील आजारी असल्याचे कारण सांगत त्यांच्या उपचारांसाठी कृष्णाकडून वेळोवेळी चार लाख रुपये घेतले होते. तिच्या वागण्यामुळे आणि सतत पैशांची मागणी करण्यामुळे कृष्णाला संशय आला. त्यानंतर त्याने अडीच महिन्यांपूर्वी थेट कराडमध्ये जाऊन शुभदा हिच्या वडिलांची भेट घेतली. त्यावेळी शुभदाने वडिलांच्या उपचारांच्या नावाखाली आपल्याकडून पैसे घेतल्याचे त्याला समजले. तिचे खोटे बोलणे कृष्णाच्या जिव्हारी लागले. त्याच कारणातून त्याने शुभदावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या शुभदाचा उपचाराच्या दरम्यान मंगळवारी (ता. 7) मृत्यू झाला. याप्रकरणी शुभदा हिची बहीण साधना कोदारे हिने (वय 26, रा. काळेवाडी फाटा, पिंपरी-चिंचवड) येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय 28, रा. खैरैवाडी, शिवाजीनगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कृष्णा याला शुभदा हिची कामावर येण्या-जाण्याची वेळ माहिती होती. शुभदाची साडेसहा वाजता ड्युटी सुरू होणार होती. त्यामुळे सहा वाजता ती बसने आली होती. अर्धा तास ड्युटीला आणखी वेळ असल्यामुळे ती एका मैत्रिणीसोबत कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये थांबली होती. कृष्णाने तिला बसमधून उतरताना पाहिले होते. दोघांची नजरेला नजर झाली, त्यांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केले. शुभदा जवळ येताच पैशांचा विषय काढला आणि वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही समजण्याआधीच त्याने चाकू काढून शुभदा हिच्या उजव्या हातावर, कोपरावर चार ते पाच वार करून तिला गंभीर जखमी केले. तिला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कृष्णा कनोजा यास न्यायालयाने 13/01/2025 पर्यंत पोलिस कोठडी रिमांड मंजूर केला आहे.
पुणे शहरात IT कंपनीतील युवतीवर कोयत्याने वार करून सहकाऱ्याने केला खून…
पुणे! विद्येच्या माहेरघरात मुलींचे कपडे बदलतानाचे Video रेकॉर्डिंग…
पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू…
पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचे कारणही समोर…
Live Video: लवळे-नांदे रोडवर आयटी अभियंता आणि कुटुंबावर जमावाने हल्ला केला…
पुणे! चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेमप्रकरणातून भावाची हत्या…
धक्कादायक! पुणे शहराजवळ कोयत्याने सपासप वार करुन एकाची हत्या…

