मोबाईलवर बनावट स्क्रीनशॉट दाखवून बंटी-बबली करायचे फसवणूक…
पुणेः एका कपड्याच्या दुकानात खरेदी करत खोटा स्क्रीन शॉट दाखवत फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला पोलिसांनी अटक केली आहे. बंटी-बबलीने ४०० हून अधिक जणांना गंडा घातल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस या बाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
गणेश बोरसे व त्याची पत्नी हा कारमाना करत होते. या दोघांनी अनेकांना फसवल्याची माहिती समोर आली आहे. कापड दुकानाच्या मालकाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता या दोघांचे कारनामे उघड झाले. गणेश व त्याची पत्नी विविध दुकानांमध्ये जाऊन खरेदी करत असत. खरेदीनंतर यूपीआयद्वारे पेमेंट केल्याचा बनावट स्क्रीनशॉट ते दाखवायचे आणि पोबारा करायचे. दोघांनी आत्तापर्यंत त्यांनी ४०० हून अधिक लोकांना गंडा घातल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
एका कपड्याच्या दुकानात खरेदी करत खोटा स्क्रीन शॉट दाखवत त्यांनी फसवणूक केली. दुकान मालकाच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेत त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा कसून शोध घेण्यास सुरूवात केली. व्यायवसायिकांना फसवल्यानंतर गणेश हा त्याचा मोबाईल स्विच ऑफ करायचा. आणि पुढल्या वेळी गुन्हा करताना नवे सिम वापरायचा. गणेश व त्याची पत्नी या आधुनिक बंटी-बबलीने आत्तापर्यंत शेकडो लोकांची फसवणूक केली आहे. आरोपी रहाटणी, वाकड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांच्या युनिट चारच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेत अटक केली. दोघांनी आत्तापर्यंत जवळपास ४०० हून अधिक जणांची त्यांनी फसवणूक केल्याचे समोर आले. पुढील तपास सुरू आहे.
पुणे शहरात फायनान्सची वाहने कमी किंमतीत देतो म्हणून मोठी फसवणूक…
शिक्षिकेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात…
मॉडेलने घातला अनेक युवकांना लाखो रुपयांचा गंडा…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ZP सदस्याला अटक; सरकारलाच गंडवले…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…