
डॉक्टर, डॉक्टर खेळण्याच्या बहाण्यातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार अन् गरोदर…
मुंबई : डॉक्टर, डॉक्टर खेळू असे सांगून एका 18 वर्षाच्या मुलाने 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून, पीडित मुलगी गरोदर असल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम 376, 376 (3), 506 पोस्को कायदा कलम 4, 8, 12, 17 प्रमाणे दोन अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
विरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत 15 वर्षाच्या मुलीगी 12 वर्षाच्या पीडित मुलीला आपल्या घरी बोलावत असे. आपल्याला डॉक्टर डॉक्टर खेळायचे आहे, सांगत असे. खेळण्याच्या बहाण्याने पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या बेडरूम मध्ये नेऊन झोपण्यास सांगत असे. त्यानंतर 18 वर्षाच्या आरोपीला रुम मध्ये बोलावून जबरदस्तीने दार लावून ती निघून गेली. त्या बेडरुममध्ये पीडित अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करण्यात आला. यानंतर मुलाने पीडित मुलीला धमकी दिली होती.
अत्याचारामुळे आणि धमकीमुळे पीडित मुलीने कोणाला काही सांगितले नाही. पण, पीडित मुलगी गरोदर राहिल्याने ही अत्याचाराची बाब समोर आली. पीडितेच्या आईने मुलीला विश्वासात घेत माहिती घेतली. त्यानंतर ही बाब उघड झाली. बुधवारी (ता. १३) याबाबत विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या विरार पोलिस या सर्व प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने राखी पौर्णिमेच्या दिवशी केला अत्याचार…
अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार…
नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार; सात महिन्यांची गर्भवती…
पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिण राहिली गरोदर…