पोलिसकाका विजय चौधरी यांनी भारताला मिळवून दिले सुवर्णपदक…

पुणे (उमेशसिंग सुर्यवंशी): महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता आणि अप्पर पोलिस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी यांनी वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स २०२३ मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. शिवाय, राहुल आवारे यांनी सुद्धा ५७ किलो गटात सुवर्ण मिळवले आहे.

कॅनडाच्या विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळात कॅनडाच्या गतविजेत्या जेसी साहोताचा पराभव करीत विजय चौधरी यांनी भारताचे नाव उंचावत जगज्जेतेपद काबीज केले. अटीतटीच्या सामन्यात विजय चौधरी यांनी साहोताचा ११-०८ अशा फरकाने पराभव केला. तसेच अंतिम सामन्यात, विजय चौधरी यांनी अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर १० गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना ११-०१ ने जिंकत भारताला 125Kg मध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले.

जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बागली या गावचा विजय चौधरी हे पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेतेपद, तसेच अनेक मानाच्या कुस्त्यांमध्ये बाजी आणि राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्रातील एक नामांकित आणि प्रतिष्ठित कुस्तीपटू विजय चौधरी आता जागतिक चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकून भारताचा नवीन ‘रेसलिंग सेनसेशनल’ बनले आहेत.

माझा विजय भारतीय पोलिसांना अर्पण…
काही महिन्यांपूर्वी मी महाराष्ट्र राज्य पोलिस दलासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्या दिवशीच मी ठरवले होते की मला जागतिक पोलिस खेळांमध्ये माझ्या देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे आहे. आज माझ्या मेहनतीचे चीज झाले असून मी जागतिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केल्याचा मला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया जगज्जेत्या विजय चौधरी यांनी विजयानंतर व्यक्त केली. ‘महाराष्ट्र राज्य पोलिस विभागातील माझ्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या सततच्या पाठिंब्यामुळेच हा विजय शक्य झाला. मी हा विजय भारतातील प्रत्येक पोलिस अधिकार्‍याला समर्पित करतो. जो देशाला प्रथम स्थान देऊन समाजाची २४ तास सेवा करत असतो. हे सुवर्णपदक मी संपूर्ण भारतीय पोलिस दलाला समर्पित करत आहे, असेही विजय चौधरी यांनी अभिमानाने सांगितले.

कौतुकास्पद! कोल्हापूर परिक्षेत्रात सोलापूर ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी…

रमेश धुमाळ: अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!

कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी

क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!

वारंवार नापास झालो, पण फौजदार झालोच!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!