पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग Video Viral…

हैदराबाद : एका पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर नेटिझन्सनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींना हा व्हिडिओ आवडला, तर काहींनी त्यावर नापसंती व्यक्त केली आहे.

विवाहापूर्वी नियोजित वर-वधू एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा समुद्रकिनारी जाऊन खास सूट परिधान करून वेगवेगळे मूड आणि अँगल्समध्ये फोटो काढत असतात. अलीकडच्या काळात प्री-वेडिंग शूट हा विवाहसोहळ्याचा अविभाज्य भाग बनला आहे. हैदराबाद येथील एका पोलिस अधिकारी कपलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ दोन मिनिटांचा आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक कपल पोलिस गणवेशात एखाद्या चित्रपटातल्या सीनप्रमाणे पोलिस स्टेशनमध्ये प्रवेश करत आहे. व्हिडिओच्या उर्वरित भागात ते चारमिनार, लाड बाजारसह शहरातल्या अन्य ठिकाणी फिरताना दिसतात.’ या व्हायरल व्हिडिओवर एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह नेटिझन्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी सी. व्ही. आनंद यांनी एक्सवर (ट्विटर) प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले आहे की, ‘मी या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया पाहिल्या. ते त्यांच्या लग्नाबद्दल थोडे अतिउत्साही असल्याचे दिसते, असे प्रामाणिक मत आहे. असा व्हिडिओ म्हणजे थोडीशी लाजिरवाणी बाब असली तरी चांगली आहे. पोलिसिंग हे विशेषतः महिलांसाठी खूप कठीण काम आहे. एखाद्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला आपल्या विभागातच जोडीदार मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे. हे दोघे पोलिस अधिकारी आहेत. त्यांनी पोलिस खात्याची मालमत्ता आणि चिन्हं वापरणे गैर आहे असे मला वाटत नाही. त्यांनी आम्हाला याआधी कळवले असते तर आम्ही चित्रीकरणासाठी नक्कीच संमती दिली असती. आमच्यापैकी काही जण नाराज होऊ शकतात. त्यांनी मला त्यांच्या विवाहासाठी आमंत्रण दिलेलं नसले तरी मला त्यांना भेटून आशीर्वाद द्यावासा वाटतो; पण इतरांनी परवानगी घेतल्याशिवाय अशा गोष्टी करू नयेत.’

दरम्यान, काही जणांनी सार्वजनिक पैसा, मालमत्ता आणि पोलिसांच्या गणवेशाचा वापर केल्यामुळे त्यांच्यावर टीका केली आहे. सार्वजनिक मालमत्तेचा वापर वैयक्तिक हेतूसाठी करणे पूर्णपणे चुकीचे आहे. ही वर्तणूक योग्य नाही. सर्व सरकारी नोकरांना अशा गोष्टीपासून परावृत्त केले पाहिजे. गणवेशाबाबत कडक नियम, कायदे असावेत, अशा प्रतिक्रिया पाहायला मिळताना दिसतात. कडक पोलिस अधिकाऱ्यापासून ते रोमँटिक जोडप्यापर्यंतच्या व्यक्तिरेखा दाखवत आहेत. सर्जनशीलता आणि विचारांची खरंच कदर आहे. चित्रपटांमध्ये असे दाखवले जाते, असेही एकाने म्हटले आहे.

कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी

पोलिस दलात SPचे अधिकार आणि कार्य काय? पगार किती; घ्या जाणून…

क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!

पाचव्या प्रयत्नात IPS! ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये जिंकले होते एक कोटी…

IPS अधिकाऱ्याचे कौतुक! पहिल्या पगाराचे काय केले पाहा….

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!