धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर झाडल्या गोळ्या…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका युवकाने एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये मुलीसह दोघांचा मृत्यू झाला असून, कुटुंबातील चौघं जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आशिष चौधरी असे आरोपीचे नाव आहे. आशिष याचे आपल्या घराशेजारीच राहाणाऱ्या एका युवतीवर एकतर्फी प्रेम होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. पण तिच्या घरचे लग्नासाठी तयार नव्हते. या प्रकरणातून हे हत्याकांड झाले आहे. छठ पूजा करून युवती आणि तिचं कुटुंब घरी आले होते. त्यानंतर युवकाने गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. यावेळी युवतीच्या कुटुंबातील सहा जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. या पैकी दोघांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर चार जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये युवतीचा समावेश आहे. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली.

पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, युवती आणि आशिषच्या कुटुंबीयांमध्ये दहा दिवसांपूर्वी वाद झाला होता. आशिषला या युवतीसोबत लग्न करायचे होते. मात्र तिच्या घरचे तयार नव्हते. यामुळे आशिषने कुटुंबाला धडा शिकवण्याच्या उद्देशाने हा गोळीबार केला. यात दोघांचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. युवतीच्या गुप्तांगावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.

एकतर्फी प्रेमातून युवतीवर बलात्कार करून केला खून अन् मृतदेह…

एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…

एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…

प्रेमविवाहानंतर नवऱ्यासह पाच जणांचा काढला काटा; गूढ उकलले…

प्रेमसंबंध तोडले, स्टॅम्पवर लिहून घेतलं तरी पहाटेच्या सुमारास…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!