पुणे! मैत्रिणीला दिवस गेल्याचे कळल्यानंतर रबडीतून दिली गोळी अन् अनेकींसोबत संबंध…

पुणे : एका युवकाने मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले. परंतु, ती गर्भवती झाल्यानंतर तिच्या नकळत रबडीमध्ये गर्भपाताची गोळी टाकून गर्भपात घडवून आणल्याची खळबळजनक घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी आदर्श वाल्मिक मेश्राम (वय २८) या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित युवती आणि आदर्श मेश्राम यांचे 2018 पासून संबंध होते. दोघे कॉलेजमध्ये एकमेकांना ओळखत होते. त्या काळात आदर्शने तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. परंतु, जेव्हा पीडित तरुणी गर्भवती राहिली, तेव्हा आदर्शने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. पीडितेच्या तक्रारीनुसार, 3 जुलै 2025 रोजी आदर्शचा वाढदिवस होता, यानिमित्त ती यवतमाळहून पुण्यात आली होती. त्यावेळी आदर्शने तिच्यासाठी रबडी आणली. मात्र त्यामध्ये गर्भपाताची गोळी मिसळली होती. ही गोष्ट पीडितेला माहीत नसल्यामुळे तिने ती रबडी खाल्ली आणि काही वेळातच तिचा गर्भपात झाला.

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

पीडित युवतीच्या मोबाईलमध्ये आदर्शचे इतर मुलींशी असलेले संवाद आणि संबंध स्पष्ट दिसले. यामुळे तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पीडित युवतीने आदर्शच्या जुन्या प्रेयसीशी संपर्क साधल्यावर, तिच्याही बाबतीत अशीच फसवणूक झाल्याचे समोर आले .या घटनेनंतर पीडितेने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कलम 376 (बलात्कार), कलम 313 (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा सध्या तपास सुरू आहे.

पीडितेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘आरोपी आदर्श वाल्मिक मेश्राम याचे इतर मुलींशी देखील संबंध होते. आदर्शचा मोबाईल पाहिल्यानंतर पीडितेला कळले की, त्याचे इतर मुलींशी संबंध आहेत. आदर्शच्या जुन्या प्रेयसीला भेटल्यानंतर तिने आदर्शचे सर्व कांड तिला सांगितले. आदर्शने लग्नाचे आमिष दाखवून तिचेही लैंगिक शोषणही केल्याचे त्याच्या जुन्या प्रेयसीने दिली. त्यानंतर 3 जुलै रोजी आदर्शने रबडीमध्ये गर्भपाताच्या गोळ्या मिसळून पीडितेला खायला दिल्या, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. उपचारानंतर पीडितेने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे हादरलं! कुरिअर बॉय असल्याचे सांगून युवतीच्या तोंडावर स्प्रे मारून केला बलात्कार…

पुणे! प्रेयसीने घरी एकटी असताना प्रियकराला घरी बोलावले अन्…

पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…

पुणे! लिव्ह इनमधील प्रेयसीच्या खूनाचे कारण सांगितले आरोपीने…

धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…

प्रेम प्रकरण! फोन सायलेंट मोडवर अन् प्रेयसीचा झाला मोठा गैरसमज…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!