धक्कादायक Video: युवकाला ६० वेळा भोसकले अन् मृतदेहासमोर नाचलाही…
नवी दिल्लीः एका अल्पवयीन आरोपीने शुल्लक कारणावरून युवकाची तब्बल 60 वेळा चाकूने भोसकून हत्या केली. युवकाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहासमोर नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
दिल्ली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला अल्पवयीन आरोपी मृतदेह एका अरुंद गल्लीत ओढतांना दिसत आहे. आरोपीने लुटण्याच्या उद्देशाने युवकावर वार केला. त्यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र, मृत्यू निश्चित करण्यासाठी त्याने तरुणावर तब्बल 60 वेळा चाकूने वार केले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आरोपी युवकाच्या मानेवर वारंवार वार करताना दिसत आहे. शिवाय, डोक्यावर अनेक वेळा लाथ मारताना सुद्धा दिसत आहे. आरोपी सायकोकिलर असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेवर आता पोलिसांनी माहिती दिली आहे.
पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. हत्येमागील हेतू दरोडा आहे. मुलाने प्रथम पीडितेचा गळा दाबला आणि जेव्हा तो बेशुद्ध झाला, तेव्हा आरोपीने त्याच्याकडे सुमारे 350 रुपये लुटण्यापूर्वी त्याच्यावर अनेक वेळा वार केले. पीडित व्यक्तीला जीटीबी रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
रामराज #Delhi में गले पर चाकू से 60 बार किया वार… मर्डर के बाद खूब किया डांस⚠️👇
दिल्ली के वेलकम इलाके में 21 नवंबर की रात 17 वर्षीय यूसुफ की हत्या कर दी गई😑
हत्यारोपी भी नाबालिग है😐
इसने बिरयानी के लिए 350 रुपए मांगे थे यूसुफ ने मना किया तो चाकू से गोदा डाला😐 pic.twitter.com/1HcKWB8gbJ— Tabish Khan 🇮🇳 (@tabishkhanss) November 23, 2023
Video: पिरंगुट घाटात भरधाव टेम्पोने अनेकांना चिरडले…
Video क्रूरतेची हद्द! युवकाच्या अंगावर ८ वेळा ट्रॅक्टर घालून चिरडले…
Video: दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा…
कारने पाच युवतींना चिरडले; अंगावर काटा आणणारा Video…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!