Video: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण…
लखनौ (उत्तर प्रदेश): महोबा जिल्ह्यातील पानवडी-अफतपुरा महामार्गावर आंदोलन थांबविण्यासाठी गेलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याला जमावाने बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
महोबा जिल्ह्यातील पानवडी-अफतपुरा महामार्गावर सायकलवरून जाणाऱ्या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेश परिवहनच्या बसने चिरडत पाच किमीपर्यंत नेले होते. मुलाचा मृतदेह आणि त्याची सायकल बसमध्ये अडकली होती. या घटनेनंतर संतप्त जमावाने रास्ता रोको करत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावेळी स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला करत मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मृत मुलाचा मृतदेह बसचालकाने अपघाताच्या ठिकाणापासून पाच किमीपर्यंत फरफटत नेला. या घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी मुलाचा मृतदेह महामार्गावर ठेवला आणि घोषणाबाजी सुरू केली. आरोपी बस चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थ करत होते. अपघातानंतर बस थांबविण्याऐवजी चालकाने गाडी आणखी वेगाने पळवल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी बस चालक पंचम आणि कंडक्टर आत्माराम याला ताब्यात घेतले. त्यानंतर अपघातास कारणीभूत असलेली रोडवेज बस पोलिस ठाण्यात नेण्यात आली. यानंतर ग्रामस्थ महामार्गावर जमा होऊ लागले आणि त्यांनी रस्ता रोखून धरला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या पथकाला धक्काबुक्की केली. त्यानंतर अचानक जमावाने एका पोलिस अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. उर्वरीत कर्मचारी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सड़क हादसे में छात्रा की मौत हुई, दुःखद है। ठीक है ग्रामीणों में गुस्सा था, सड़क जाम कर दी। लेकिन शर्मनाक ये हैं कि लोगों ने एक दरोगा को दौड़ा दौड़ा कर पीटा। डंडे, लात-घूंसे बरसाए। वायरल वीडियो महोबा के पनवाड़ी थाना इलाके का बताया जा रहा है। बाकी @Uppolice पिटाई की हकीकत बताएगी.. pic.twitter.com/MkcQzpW4PS
— Naval Kant Sinha | नवल कान्त सिन्हा (@navalkant) October 30, 2023
Video: पोलिसाने पळत जाऊन घातली चोरट्यांच्या दुचाकीला लाथ…
Video: व्यापाऱ्याला बेदम मारहाण अन् नग्न करून काढली धिंड…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!