पुणे जिल्ह्यात दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीत लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पेठ (ता. आंबेगाव जि, पुणे) या गावातील वलखेड वस्ती येथे दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंद बंगल्याच्या कपाटातील लॉकर मधून ४ लाख ६३ हजार ४२५ रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

सदर घटनेबाबत शरद तुकाराम पवळे (रा. पेठ ता. आंबेगाव जि. पुणे) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेबाबत मंचर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्याददार शरद पवळे हे पेठ येथील वलखेड वस्ती, यात्रेनिमित्त नारोडी येथे पत्नीसमवेत गेले होते. दुपारनंतर ते घरी आले असता त्यांना घराचा सेफ्टी दरवाजा उघडा दिसला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले कपतटातून दागिने व रोख रक्कम राणी हार, सोन्याचे गंठण, कानातील सोन्याचे टॉप, दोन सोन्याच्या अंगठ्या व पाच हजार रुपये रोख एकूण चार लाख ६३००० हजार ४४५ किमतीचे म्हणजे दागिने व रोख रक्कम चोरून नेले आहे.

दरम्यान, सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अरुण फुगे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक यादव हे करत आहेत.

पुणे जिल्ह्यात महिला अनोळखी व्यक्तीसोबत फिरताना दिसली म्हणून केला खून…

पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाला नेहाने घातला गंडा…

पोलिसकाका, पुणे पोलिस आयुक्तांची तत्परता! हरवलेली मुलगी सापडली रांजणगावात…

पुणे जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या; कारण सांगितले…

पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!