न्यूज ऍंकर सलमा सुल्ताना हिचा शोध घेण्यात पाच वर्षांनी पोलिसांना यश…

रायपूर (छत्तीसगड): न्यूज ऍंकर सलमा सुल्ताना हिच्या खुनाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी हत्येचा उलगडा होताच प्रियकर मधूर साहू याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली आणि ५ वर्षांनी या हत्येचे रहस्य उघडले.

कोरबाच्या कुसमुंडा भागात राहणारी सलमा सुल्ताना (वय १८) हिने १० वीच्या परीक्षेनंतर २०१६ मध्ये ती टीव्ही पत्रकारितेत आली. स्क्रीनवर ती दिसू लागली आणि खूप कमी वयात तिने टिव्ही जगतात स्वत:ची नवी ओळख निर्माण केली. तिने अँकरिंगसोबत रिपोर्टिंग, स्टेज शो आणि अन्य कार्यक्रमात भाग घेतला. एका मोठ्या टीव्ही चॅनेलचे अँकर होण्याचे तिचे स्वप्न होते. परंतु तिचे हे स्वप्न अपूर्ण राहील याची कल्पनाही तिने केली नव्हती.

सलमा ऑक्टोबर २०१८ मध्ये नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी कुसमुंडाहून कोरबा येथे निघाली. पण, घरी परतीच नाही. घरचे तिला शोधत राहिले परंतु काहीच सुगावा लागला नाही. न्यूज अँकर सलमा बेपत्ता झाली ही बातमी स्थानिक पत्रकार आणि लोकांमध्ये पसरली. वेगवेगळ्या अफवा उडू लागल्या. सलमा मुंबईला गेली ही अफवा खूप चालली. परंतु सलमा कुठे आहे याचे कारण कुणी शोधले नाही.

सलमाचे कुटुंब तिचा शोध घेऊन थकले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला. जवळपास २ महिन्यांनी जानेवारी २०१९ मध्ये कुसमुंडा पोलीस ठाण्यात सलमा सुल्ताना बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. परंतु सलमाचा शोध पोलिसांनाही लागला नाही. कुटुंबानेही अपेक्षा सोडली. परंतु याचवर्षी एसपी रॉबिन्सन यांनी सलमा केस पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आणि नव्याने तपासाला सुरुवात केली.

आयपीएस अधिकारी रॉबिन्सन यांनी अनेकांना चौकशीसाठी बोलावले. चौकशीदरम्यान सलमाचा खून झाल्याचा सुगावा लागला. ३० मे रोजी पोलिसांना कळाले की, तिचा खून झालेला आहे. पोलिसांनी सखोल चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा गुन्हेगाराने सलमाचा मृतदेह कोरबा दर्री मार्गावरील एका तलावाशेजारी दफन केल्याचे समजले. घटनास्थळी पोलिसांनी जेसीबी मशिनने उकरून पाहिले पण हाती निराशा लागली. ५ वर्षानंतर त्याठिकाणची स्थिती बदलली होती. दफन केलेल्या ठिकाणी रस्ता बनला होता. त्यामुळे पोलिसांनी ३ डी स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यात एक पुरावा सापडला. ज्याठिकाणी शोध सुरू होता तिथे एका गोणीत मानवी हाडे जप्त करण्यात आली. ही हाडे एका मुलीची आहेत असे कळाले. पोलिसांनी हाडे जप्त करून लॅबमध्ये पाठवली.

पोलिसांना चौकशीदरम्यान सलमाने कोरबातील एका बँकेतून कर्ज घेतल्याचे समोर आले. २०१८ पर्यंत या कर्जाचे हफ्ते एक युवक फेडत होता. परंतु २०१९ पासून त्याने कर्जाचे हफ्ते फेडणे बंद केले. सलमाने युवकाला हफ्ते भरण्यास सांगितले होते. परंतु त्याने नकार देत सलमाशी वाद घालू लागला. परंतु हा युवक कोण हा प्रश्न पोलिसांना पडला. सलमाचे मधूर साहू (रा. बिलासपूर) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. कोरबा येथे तो जिम चालवायचा. मधूर आणि सलमा यांच्यात प्रथम मैत्री आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबधात झाले होते. पोलिसांनी मधूरवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

मधूरच्या मोलकरणीबाबत पोलिसांना कळाले, तिला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा सलमाच्या हत्येचा उलगडा झाला. तिने पोलिसांना सांगितले की, सलमाची हत्या २०१८ मध्ये झाली होती. मधूर साहू आणि त्याच्या मित्रांनी ही हत्या केली. परंतु सलमाचा खून केल्यावर मधूर फरार झाला होता. त्यानंतर कालांतराने तो पुन्हा कोरबा येथे आला. पोलिसांनी हत्येचा उलगडा होताच मधूर साहूसह त्याच्या साथीदारांना अटक केली आणि ५ वर्षांनी या हत्येचे रहस्य उघडले.

मुंबईमधून शिक्षिका मारिया खान बेपत्ता; काही अघटित तर नाही ना…

हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…

संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत युवक-युवती पार्टी करून आले अन्…

लॉजवर मैत्रिणीसोबत असताना शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने युवकाचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!