पुणे शहरात मॉर्निंग वॉक करताना पत्ता विचारण्याचा बहाना करून चैन चोरणारा ताब्यात…

पुणे (संदिप कद्रे): चतुशृंगी पोलिस स्टेशनकडून चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

२४/१०/२०२४ रोजी पहाटे ०४/३० वा चे सुमारस रेंज हिल्स रोड, अशोक नगर, पुणे या ठिकाणी मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका वयस्कर व्यक्तीस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्याच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चैन दोन अनोळखींनी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेल्याबाबत चतुश्रुंगी पोलिस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक ८४१/२०२४ भा. न्या . सं. कलम ३०४(२),३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीनियर सिटीजन च्या गळ्यातील सोन्याची चैन मॉर्निंग वॉक करताना जबरदस्तीने चोरून नेल्याने वरिष्ठांनी सदरचा गुन्हा उघडकिस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या.

गुन्ह्याच्या घटनास्थळी चतुश्रुंगी पोलिस स्टेशनचे व. पो. नि. विजयानंद पाटील तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकातील स. पो. नि. नरेंद्र पाटील व पो. हवा. वाघवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा पाटील इस्टेट येथील इराणी व त्याचा एक मित्र यांनी केला आहे. ते सध्या जे एम रोड, पुणे येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलिस पथकासह जे एम रोड, पुणे येथे जाऊन सापळा रचला. गुन्ह्यातील आरोपी अली अजगर जावेद इराणी (वय २१ वर्ष, रा. इराणी वस्ती, विष्णू कृपा नगर, शिवाजीनगर, पुणे) व त्याचा साथीदार विधीसंघर्शित बालक यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी अली अजगर जावेद इराणी यास नमूद गुन्ह्यामध्ये अटक करून त्याची न्यायालयाकडून पोलिस कोठडी रिमांड प्राप्त करून पोलिस कोठडी दरम्यान त्याच्याकडून दोन तोळ्याची सोन्याची चैन व गुन्हा करताना वापरलेली ऍक्टिवा गाडी असा एकूण १,५०,०००/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मनोज पाटील, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर, हिम्मत जाधव, सहा. पोलिस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली चतुशृंगी पोलिस स्टेशनचे व. पो. नि. विजयानंद पाटील, स पो नि नरेंद्र पाटील, पो उ नि चौगुले, पो हवा वाघवले, पो हवा दुशींग, पो हवा श्रीधर शिर्के, पो हवा दांगडे, पो हवा मोमीन, पो हवा विशाल शिर्के, पो हवा तांदळे, पो शि भांगले व पो शि तरंगे यांनी केली आहे.

पुणे शहरातील नागरिकांनी टेकडीवर घडलेल्या गुन्ह्याबाबत काय काळजी घ्यावी? याबाबत सूचना…

पुणे शहरातील तडीपार आरोपीस दरोडा व वाहन चोरीच्या पथकाने घेतले ताब्यात…

पुणे पोलिसांनी अवैद्य गावठी हातभट्टी केली कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

पुणे शहरात जबरी चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात…

पुणे शहरात बाणेर टेकडीवर महिलांना जबरदस्तीने लुटणारी टोळी जेरबंद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!