हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…
चेन्नई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नित्या शसी आणि तिची मैत्रिण बीनू यांना पोलिसांनी हनी ट्रॅपिंग प्रकरणी अटक केली आहे. एका ७५ वर्षीय माजी सैनिकाकडून 11 लाख रुपये उकळल्याप्रकरणी अटक केली आहे. ही घटना केलमधील परवूर जिल्ह्यातील आहे.
नित्या सासी ही 32 वर्षांची असून मलयालपुझा, पठानमथिट्टा येथील रहिवासी आहे. परावूर येथील बिनू कलाईकोडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. नित्या स्वतः एक वकील देखील आहे. या दोघींनी मिळून केरळ विद्यापीठातील माजी कर्मचारी आणि 75 वर्षीय माजी सैनिक (तिरुवनंतपुरम) यांना आपला बळी बनवले आहे. या घटनेची सुरुवात 24 मे रोजी झाली. संबंधित व्यक्तीला त्याचे घर भाड्याने द्यायचे होते आणि नित्याने त्याच्याशी फोनवर संपर्क साधला होता.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांनी नित्या घर बघायला आली आणि दोघांची चांगलीच मैत्री झाली. ती घरात शिरली आणि कपडे काढून त्याच्यासोबत नग्न छायाचित्रे काढू लागली. यानंतर तिने धमक्या देण्यास सुरुवात केली. बिनूही तिथे उपस्थित होती आणि ती त्यांचे फोटो काढत होती, असे त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितले.
दोघींनी त्याच्याकडे 25 लाखांची मागणी केली आणि ती छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. अनेक धमक्या दिल्यानंतर अखेर त्या व्यक्तीने त्याला 11 लाख रुपये दिले. पण, पुन्हा पैशांची मागणी सुरू केली. यानंतर त्यांनी 18 जुलै रोजी परावूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
रवींद्र महाजनी यांचा शवविच्छेदन अहवाल हाती; शेजारी म्हणाले…