नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात! पाच मजुरांना चिरडले…

पुणे : कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीत दत्त मंदिराजवळील कठेश्वरी पुलालगत भरधाव येणाऱ्या कारने पाच परप्रांतीय मजुरांना चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू तर एकाचा उपाचरादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींवर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण शेतमजुर असल्याची माहिती समोर आली आहे.

जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत झालेल्या तिघांची नावे आहेत. रविवारी (ता. २४) रात्री साधारण आठ ते सव्वा आठव्या सुमारास हा अपघात झाला आहे. मोटारीवरी नियंत्रण सुटून हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नगर-कल्याण महामार्गावर दोन ते तीन दिवसांपूर्वीच डीगोरे परिसरात पाच शेतमजूर मध्यप्रदेश येथून आले होते. रविवारी संध्याकाळी शेतातील कामे उरकून ते पायी घरी जात असताना महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकी क्र एम एच 12 व्ही क्यू 8909 ही भरधाव वेगात होती. त्या गाडीने या पाच मजुरांना जोरात धडक दिली त्यात ते चिरडले गेले. यावेळी दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, कल्याण-अहमदनगर महामार्गावर गेल्या काही वर्षांत अनेक अपघात झाले असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. बेशिस्तपणे वाहतुकीमुळे अपघात घडत असल्याची माहिती पुढे येत आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कुटुंबावर काळाचा घाला…

पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, तीन ठार…

बेल्हे-जेजुरी महामार्गावर भीषण अपघातात एकूलता एक मुलगा गमावला…

Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!