लोणावळा येथे पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारा ताब्यात…
लोणावळा (संदीप कद्रे): लोणावळा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगीरी केली आहे. पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून चोऱ्या करणाऱ्या आरोपीच्या तीन तासात मुसक्या आवळल्या असून, पुढील तपास करत आहेत.
लोणावळा परीसरात जुने पुणे मुंबई हायवे रोडवरील तसेच मळवली, कार्ला भाजे परीसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात. मौजे भाजे व मनशक्ती केंद्र वरसोली परीसरामध्ये शनिवारी (ता. २१) पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून गाडीतील मौल्यवान बॅगांमधील रोख रक्कम, मोबाईल इतर मौल्यवान वस्तु इत्यादी कोणीतरी अज्ञात चोरटा चोरून नेत असल्याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनला दोन तक्रारदार तक्रार देण्यास आले होते. त्यांच्याकडून उपयुक्त माहिती घेवून त्यानुसार सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक व पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार नितेश कवडे व पोलिस नाईक गणेश होळकर यांचे पथक रवाना झाले.
सदर पथकाने घटनेच्या अनुषंगाने आरोपीचा व गाडीचा शोध घेण्यासाठी प्रथम मनशक्ती केंद्र वरसोली येथे घडलेल्या घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पहाणी केली. सदर फुटेजमध्ये इनोव्हा सदृष्य कारमधील 30 ते 35 वयाचा अंगात चॉकलेटी रंगाचा टी शर्ट घातलेला व्यक्ती हा चारचाकी गाडीची काच फोडून चोरी करताना आढळल्याने पोलिसांनी सदर संशयीत इनोव्हा कारचा वरसोली, कार्ला, मळवली, भाजे व लोहगड परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी काळ्या काचा असणारी टोयोटा कंपनीची इनोव्हा कार नं. GJ 06 FC 3806 ही मौजे भाजे धबधबा नं. 2 परीसरात संशयीत रित्या फिरत असताना मिळून आली.
पोलिसांनी कारचालकाकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अखिल सलीम व्होरा (वय 32, रा. नुतन नगर अमिना मंजील जवळ, आनंद, गुजरात 388001) असे सांगीतले. पोलिसांनी सदर कारची झडती घेतली असता नमुद कार चालकाकडे इनोव्हा गाडीमध्ये सीमकार्ड नसलेले एकूण 6 मोबाईल, तसेच 5 पर्स, 2 बॅगा, 2 पॉवर बँक, 2 घड्याळे, 22,900/- रोख रक्कम व इनोव्हा कार असा एकुण 12,11,100/- रुपये असा माल मिळून आला आहे. त्याबाबत पोलिसांनी अधीक चौकशी केली असता सदर माल व रोख रक्कम ही काही गाड्यांच्या काचा फोडून चोरी केली असल्याचे त्याने कबूली दिली. त्यास पुढील चौकशी कामी पोलिस स्टेशन येथे आणले. सदर चोरीच्या घटनेबाबत लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. 350/2023 भादवि 379,427 व गु.र.नं. 351/2023 भादवि 379,427 असे गुन्हे दाखल झाले असून सदर आरोपीकडून जप्त केलेल्या वस्तुंमध्ये सदर दोन्ही गुन्ह्यातील तक्रारदार यांच्या वस्तु मिळून आल्या आहेत. सदर आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने 22/08/2023 रोजी पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड दिली आहे.
सदर आरोपी जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस स्टेशनला त्यांचेकडील गुन्ह्यात पाहीजे असल्यास लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन व्यतीरीक्त यापुर्वी लोणावळा शहर, कामशेत पोलिस स्टेशन हद्दीत देखील अशा प्रकारचे गुन्हे घडलेले असून अशा गुन्ह्यांचा कसोशीने तपास करुन गुन्हे उघडकीस आणन्याबाबत सहा. पोलिस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी सर्व पोलिस पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत सदरचे दोन गुन्हे घडताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तत्परता दाखवून यातील गुन्हेगारास शिताफीने अटक करुन दोन्ही गुन्हे तात्काळ उघडकीस आणले आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश गट्टे, सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तीक व वरीष्ठ पोलिस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक निलेश माने, पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले, सहा. फौजदार युवराज बनसोडे, पोलिस हवालदार नितेश कवडे, पोलिस नाईक गणेश होळकर, पोलिस हवालदार बाळकृष्ण भोईर, पोलिस हवालदार विजयभाऊ मुंढे यांचे पथकाने केलेली असून गुन्ह्यांचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करीत आहेत.
सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…
समृद्धी महामार्गावर फोटो, व्हिडीओ काढाल तर तुरुंगात जाल…
मुंबईमधून शिक्षिका मारिया खान बेपत्ता; काही अघटित तर नाही ना…
पुणे शहरात फायनान्सची वाहने कमी किंमतीत देतो म्हणून मोठी फसवणूक…
महाराष्ट्रातील कैद्यांना झाली पगारवाढ; पगार किती मिळतो पाहा…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…